
अवैधरित्या शहरात विक्रीकरीता येणारा देशी विदेशी दारुचा साठा LCB च्या पथकाने पकडला…
वर्धा शहरात रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत विक्रीकरीता येणारा देशी विदेशी दारुचा साठा वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
वर्धा(प्रतिनिधी) –सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 09/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अॅन्टी गॅग सेल पथक पोलिस स्टेशन वर्धा
शहर, रामनगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर छापा कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या
गोपणीय माहितीवरून ग्रे रंगाच्या हुन्डाई कंपनीची क्रेटा गाडी क्रमांक एम.एच. 48 ए.सी. 9279 चालक 1) योगेश उर्फ सोनू विश्वकर्मा, रा. समता नगर, आंबेडकर उद्यान समोर, वर्धा व त्याचा साथीदार 2) आकाश दिपक जयसिंघानी, 35 वर्ष, रा. सिंदी कॉलनी, पोद्यार बगिचा, रामनगर, वर्धा, यांचेवर घेराव टाकुन छापा टाकला असता चालक सोनू विश्वकर्मा याला पोलिसांनी घेरल्याची चाहूल लागताच गल्ली बोळातुन पळुन गेला. त्याचा साथीदार आकाश जयसिंघानी हा दारूमालासह मिळुन आला. त्याचे ताब्यातुन पंचासमक्ष क्रेटा गाडीच्या मागील सिटवर व डिक्की मध्ये खर्ड्याच्या खोक्यात वेगवेगळ्या कंपनीचा देशी विदेशी दारूसाठा


1) ऑफीसर चॉईस कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 200 नग प्लास्टीच्या सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 475 दिनांक 16.12.23 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 60,000/- रू.

2) ऑफीसर चॉईस ब्ल्यु कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 192 नग प्लास्टीच्या सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 489 दिनांक 21.12.23 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 57,600/- रू.

3) आर. एस कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 175 नग काचेच्या सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 2877 दिनांक 07.12.23 असा असुन प्रती नग 350रू. प्रमाणे 61,250/- रू.
4) आर.सी. कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 66 काचेच्या सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 1057 दिनांक 25.1223 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 23,100 रू
5)टयुबर्ग प्रिमियम बियर स्ट्रॉग 500 एम.एल.च्या 48 सिलबंद कॅन ज्यावर बॅच नंबर 985 दिनांक 02.11.23 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 14,400 /- रू.
6) टॅगो कंपनी 90 एम.एल.च्या देशी दारूने भरलेल्या 400 प्लास्टीकच्या सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 501 डिसेंबर 2023 असा असुन प्रती नग 100 रू. प्रमाणे 40,000/- रू.
7) ओल्डमन्क XXX कंपनिची 180 एम.एलची Rum भरलेली 48 सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 555 डिसेंबर 2023 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 14,400/- रू.
8) मॅजिक मुमेंट रेमीक्स 180 एम.एल. काचेच्या दारूने भरलेल्या 20 बाटल्या प्रति नग 350 रू प्रमाणे 7,000/ रू
9) मॅकडॉल नं.01 कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 18 काचेच्या सिलबंद बाटल्या ज्यावर बॅच नंबर 705 दिनांक 18.12.23 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 6,300 रू.
10) गोवा संत्रा कंपनिच्या 180 एम.एल च्या काचेच्या देशी दारूने भरलेल्या 48 सिलबंद बाटल्या प्रति नग 150 रू प्रमाणे 7,200 रू.
11 ) रॉयल स्टॅग कंपनिचे 375 एम.एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 03 काचेच्या सिलबंद बाटल्या ज्याचा बॅचनंबर 67 डिसें. 23 असा असुन प्रति नग 600 रू प्रमाणे 1,800 रू
12) रॉयल स्टॅग कंपनिच्या 750 एम.एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 03 काचेच्या सिलबंद बाटल्या प्रति नग 1500 रू प्रमाणे 4,500 रू
13) रॉयल स्टॅग कंपनिच्या 2 लिटर च्या विदेशी दारूने भरलेल्या
02 प्लास्टीक च्या सिलबंद बाटल्या प्रति नग 2500 रू प्रमाणे 5000/- रू.
14) ऑफीसर चॉईस ब्ल्यु कंपनिच्या 2 लिटरचा विदेशी दारूने भरलेल्या 01 प्लास्टीक सिलबंद बाटली ज्याचा बॅच नंबर 191 तारीख 17.11.23 असा असुन किमंत 2,500/- रू.
16) ग्रे रंगाच्या हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी क्रमांक एम. एच. 48 ए.सी. 9279 असा असुन चेचीस क्रंमाक MA3FXEB1S00246902 KG कि 12,00,000/- रू. असा एकुण जु.कि. 15,05,050/- रू. चा माल जप्त पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आला आहे
सदरचा देशी विदेशी दारूसाठा हा वर्धा जिल्हयाचे सिमेवरील मौजा विटाळा जिल्हा अमरावती येथील उदयबारचा मालक व चालक अंकित जयस्वाल रा. सावंगी मेघे, वर्धा याचे दुकानातून विकत आणला अशी माहीती दिल्याने त्याचेविरूध्द पोलिस स्टेशन रामनगर येथे कलम 65 (अ) (ई).77 (अ). म. दा. का. सहकलम 3 (1) / 181, 130/177 मोवाका गुन्हा नोद करण्यात आला आहे
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, पो.हवा. गजानन लामसे, रितेश शर्मा, पोलिस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


