
अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धडाकेबाज कार्यवाही,१ कोटीच्यावर मुद्देमाल जप्त…
विनापरवाना वाळुची( रेती) चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने केले जेरबंद, ३ LP ट्रकसह एकुन 1,37,77,000/- मुद्देमाल जप्त….
बुटीबोरी(नागपुर) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 20/1/24 रोजी १०.३० वा दरम्यान खबरीद्वारे खात्रीशीर माहीती मिळाली कि 3 मोठे ट्रक भंडारा-मौदा-बुटीबोरी मार्गे वर्धी येथे अवैधरित्या विनापरवाना वाळुची (रेतीची )वाहतुक होत आहे अशा मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून जगत हॅाटेल जवळ पथकासह नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहीतीनुसार 3 LP ट्रक ( दोन 16 चाकी एक 14 चाकी) येतांना दिसले त्यास थांबवुन तपासनी केली असता त्यात 42 ब्रास वाळु(रेती) ही नाकाडोंगरी जिल्हा भंडारा येथुन भरुन अवैधरित्या वर्धा येथे घेऊन जात असल्याचे सांगितले


वरुन MH40AK4198 चा मालक महादेव उर्फ बबलू पारधी पत्ता- देवलापार व MH40CT5932 चा मालक जुबेर खान पत्ता- जि.वर्धा यांचेवर पोलिस स्टेशन बुटीबोरी येथे अप. क्र व कलम-48/24 कलम 379, 109, 34 भादवि, कलम 48(7), (8) महसूल अधि., कलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रति. कायदा, कलम 4, 21 खान व खनिज अधि.प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला असुन 3 ट्रक व त्यातील वाळु व मोबाईल असा एकुन 1,3777000/- रु चा मुद्देमाल जप्त करुन पोलिस स्टेशन बुटीबोरी यांचे ताब्यात देण्यात आला असुन 7 आरोपी पैकी 5 आरोपीस अटक करण्यात आली असुन 2 आरोपी फरार आहेत

सदरची धडक कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक डॅा संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पांडे,पो हवा ललीत उईके,नापोशि ,कार्तिक पुरी,पोशि बालाजी बारगुले,शुभम मोरोकार यांनी केली



