पांढरकवडा हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत स्थागुशा पथकाने केला उलगड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीतील गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,२ आरोपीना केली अटक…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  पांढरकवडा हद्दीत दि.१ चे रात्री १०/०० ते दि.२ चे ८.०० वा चे  दरम्यान पांढरकवडा ते मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम वाई रोडवर





सचिन तुकाराम कुनघाडकर वय २३ वर्षे, रा. चंद्रशेखर वार्ड पांढरकवडा जि.- यवतमाळ



यास डोक्यावर व कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन खुन केल्याची घटना घडली होती सदर घटने संबधाने दि. २ फेब्रुवारी रोजी म्रुतक सचिन याचे काका रमेश मारोती कुनघाडकर रा. बेतवार लेआउट पांढरकवडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्रमांक  १२२/२०२४ कलम ३०२ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरु होता.
सदरचा गुन्हा हा गुंतागुंतीच्या स्वरुपाचा व गुन्हयातील आरोपी संबधाने कोणताही पुरावा घटनास्थळी मिळुन न आल्याने अज्ञात आरोपी शोध करने शर्तीचे होणार ही बाब लक्षात घेवुन त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथकासह उपविभागीय पोलिस अधिकारी, कार्यालय पांढरकवडा व पोलिस स्टेशन पांढरकवडा यांचेकडील पथके तयार करुन आरोपींचा  शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता  आदेशीत केले होते.
त्यावरुन सर्व पथके आपआपले कौशल्य पणाला लावुन गुन्हा उघडकीस आणने करीता शर्तीचे प्रयत्न करीत होते. मृतका
संबधाने माहिती गोळा करुन त्यादृष्टीने आपआपले गोपणीय बातमीदार पथकांनी पांढरकवडा व परिसरात नेमले होते
अशातच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, मृतक सचिन तुकाराम
कुनघाडकर हा दिनांक ०१/०२/२०२४ रोजी रात्री त्याचे मित्र



१) सय्यद अरबाज उर्फ भुन्या सय्यद मन्सुर रा. मस्जीद वार्ड, पांढरकवडा

२) अब्दुल रहमान अब्दुल जब्बार रा. मोमीनाबाद कॉलनी पांढरकवडा

यांचेसह दारु प्यायला गेला होता त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी क्षणाचाही विलंब न करता नमुद दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन सचिन तुकाराम कुनघाडकर हा त्यांचा मित्र असल्याचे व नमुद दोघानींही दिनांक ०१/०२/२०२४ रोजी रात्री त्याचे सोबत दारु पिवुन सय्यद अरबाज उर्फ भुया सय्यद मन्सुर याचे सोबत असलेल्या जुन्या वादाचे कारणावरुन त्यास मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम वाई रोड परिसरात नेवून काठीने व डोक्यावर दगड टाकुन त्यास जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली असल्याने नमुद दोन्ही आरोपींना
पुढील कारवाई कामी पोलिस स्टेशन पांढरकवडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा  रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, अमोल माळवे पो.स्टे. पांढरकवडा, सपोनि
अमोल मुडे, पोलिस शिपाई सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ तसेच पोलिस स्टेशन पांढरकवडा येथील पथक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!