
स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथुन चोरीतील नगदीसह किंमती मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील ३ गुन्हे केले उघड….
स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील कडीया राजगड येथुन कुख्यात सॅासी गॅंग कडुन अकोला येथील विविध पोलिस स्टेशनला नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ५,९१,०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील स्थागुशा चे पथक सतत १२ दिवस राजगड मध्यप्रदेश येथे तळ ठोकुन होते….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हॉटेल व्हि एस बाळापुर नाका, अकोला येथे दि ३० रोजी लग्न असतांना सदर लग्नात कोणीतरी अज्ञात चोरटयाने नवरीला आलेले गिफट (पैसे व दागिने) असलेली बॅग चोरून नेली घटनेचे गांभीर्य पाहुन पोलिस अधिक्षक, अकोला यांचे आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथक तयार करून तपास सुरु केला त्यावरून सदर गुन्हयात समांतर तपास करून तांत्रीक विश्लेषण केले असता गुन्हे हे ग्राम कड़ीया साँसी, जि. राजगढ मध्यप्रदेश येथील आरोपी असल्याचे निष्पन्न करून त्या ठिकाणी पथक रवाना करून तपासा दरम्यान अथक परीश्रम करून वर नमुद गुन्हयातील आरोपी हे गुन्हा केल्यापासुन गावातुन फरार असुन गुन्हयात चोरी केलेला मुददेमाल त्यांच्या घरी असल्याची गुप्त माहीती काढून आरोपींची घरझडती घेतली असता खालील नमुद तिन्ही गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाला पैकी एकुण ५ लाख ९१ हजार रूपये नगदी हस्तगत करण्यात आले.



सदर प्रकरणी १) पो. स्टे डाबकी रोड अकोला येथे अप. क ६८/२०२५ क.३०३ (२) भा. न्या.सं. प्रमाणे दाखल होता त्यामधील फिर्यादी विशाल अशोककुमार पंजवानी रा. सिंधी कॅम्प, अकोला यांनी रिपोर्ट दिला की, त्यांचे बहीणीचे लग्न होटेल व्हि एस बाळापुर नाका, अकोला येथे दिनांक ३०.०१.२०२५ रोजी असतांना सदर लग्नात कोणीतरी अज्ञात चोरटयाने नवरीला आलेले गिफट (पैसे व दागिने) असलेली बॅग चोरून नेली त्यामध्ये ५ लाख नगदी, तसेच एक सोन्याची चैन १५ ग्रॅम व दोन सोन्याच्या अंगठया प्रत्येकी ४ ग्रॅम, एक अॅपल कंपनीचा मोबाईल असा मुददेमाल चोरून नेला होता.

तसेच दुसर्या एका घटनेत २) पो. स्टे अकोट शहर अकोला येथे अप. क ०८/२०२५ क.३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे दाखल होता त्यामधील फिर्यादी नामे राजेश उर्फ भास्कर बाबाराव सावरकर रा. कावसा ता. अकोट जि. अकोला यांनी रिपोर्ट दिला की, ते त्यांचे जवळ असलेली व बँकेतुन काढलेली अशी एकुण ३ लाख रूपये रक्कम बँकेत दाखल करण्या करीता जात असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे पाठीवर टॉमेटो कॅचअप ची घाण टाकुन लक्ष विचलीत करून त्याचेजवळील बॅग चोरून नेली अशा रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसरी घटना ही ३) पो स्टे सिटी कोतवाली अप नं २३५/२०२४ कलम ३०३ (२) भा व्या सं प्रमाणे दाखल होता त्यामधील फिर्यादी नामे अब्दुल सादीक अब्दुल समद रा. अकोट फैल अकोला हे त्यांचे पेंशनचे पैसे बँकेत भरण्या करीता जात असतांना कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांचेवर पाळत ठेवुन पाठलाग करून गाडीला लटकुन असलेली पैश्यांची थैली काढुन घेतली त्यामध्ये असलेले ४१ हजार रूपये चोरून नेले अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनात सपोनि विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, माजीद पठाण स्थागुशा. पो. अमंलदार अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, अशोक सोनोने, राहुल गायकवाड चालक पो. हवा प्रशांत कमलाकर तसेच सायबर चे आशिष आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.



