
अवैधरित्या डिझेलचा साठा करुन त्याची किरकोळ विक्री करणार्यावर सावंगी मेघे पोलिसांचा छापा….
अवैद्यरित्या डिझेलची विकी करणार्यावर सावंगी मेघे पोलिसांची धडक कार्यवाही…
सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सेलुकाटे परीसरात अवैधरित्या डिझेलची विक्री होतेय अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याअनुषंगाने सावंगी मेघे येथील डि बी पथक सावंगी पोलिस स्चेशन हद्दीत भुगाव परीसरात पेट्रोलीग करीत असतांना मुखबीर कजुन खात्रीशिर खबर मिळाली की मौजा सेलुकाटे येथे राहणारा रूपेश अरूण वाणी नामक ईसम हा त्याचे राहते घरी त्याचे साथीदाराचे सहाय्याने अवैधरुत्या डिझेलची विक्री करतोय



अशा गोपनीय माहीतीवरुन सदर ठिकाणी तपासनी केली असता सदर ठिकाणी दोन ईसम डिझेलची चोरटी विक्री करतांना आढळुन आले त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आरोपी क्र १ ) रूपेश अरूण वाणी वय 41 वर्ष रा सेलुकाटे ता जि वर्धा आरोपी क्र 2) मदन सुखचंद धुवारे वय 46 वर्ष रा सेलुकाटे ता जि वर्धा असे सांगीतले हे दोघे मिळुण अवैधरित्या डिझेलची साठवणुक करून डिझेलची अवैधरित्या चोरटी विकी करीत होते

सदर ठिकाणी पंच व पो स्टॉफसह त्याचे घराचे झडतीत टिनाच्या शेड मध्ये 1) दोन मोठ्या गोल प्लास्टीकच्या कॅनमध्ये प्रती कॅन 20 लिटर प्रमाणे 40 लिटर डिझेल प्रती लिटर 90/- रू प्रमाणे 3600/- रू व दोन मोठ्या गोल प्लास्टीक कॅन किंमत 200/- रू प्रमाणे 400/- रू 2) एका मोठ्या प्लास्टीक कॅन मध्ये 25 लिटर डिझेल प्रती लिटर 90/- रू प्रमाणे 2250/- रू व एक मोठी प्लास्टीक कॅन किंमत 400/- रू ३) एका मोठ्या गोल प्लास्टीक कॅनमध्ये 45 लिटर डिझेल प्रती लिटर 90/- रू प्रमाणे 4050/- रू व एक प्लास्टीक कॅन किंमत 600/- रू असा एकुण किंमत 11300/- रू माल अवैधरित्या निष्काळजीपणे जवळ बाळगल्या स्थितीत मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून नमुद दोन्ही आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन सावंगी मेघे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोउपनि गोपाल शिंदे, पोहवा चंदु सानोने , पोशि वैभव जगणे , चालक पोशि सुमित राठोड सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.



