अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ५ जुगार अड्ड्यांवर धाडी; १७ जणांना अटक, ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत ५ ठिकाणी धाडी टाकून १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही धडक मोहीम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राबवली.



कारवाईचा सविस्तर तपशील:

  • दगडपारवा (पो.स्टे. बार्शीटाकळी): ५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्राम दगडपारवा येथे छापा टाकून शुभम नारायण डोंगरे या आरोपीकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण ५,८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



  • बादशहा चौक (पो.स्टे. रामदास पेठ): ६ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या कारवाईत सद्दाम नौरंगाबादी, इलियास चौधरी आणि हसन हिरेवाले या ३ आरोपींकडून ७,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • सावतराम मील जवळ (पो.स्टे. सिटी कोतवाली): ६ ऑगस्ट २०२६ रोजी सर्वात मोठी कारवाई सावतराम मील भागात झाली. येथे शेख सुभाण, धीरज अकिणे, शाहीद अहेमद, मोहम्मद मुजाईद, इब्राहीमखान आणि रत्नदीप घुगे या ६ आरोपींना अटक करून जुगार साहित्य, मोबाईल, मोटरसायकल आणि रोख रक्कम असा एकूण ३,०३,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



  • ग्राम बोर्डी, आठवडी बाजार (पो.स्टे. अकोट ग्रामीण): ६ ऑगस्ट २०२६ रोजी ३ आरोपींवर कारवाई करत ३,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • ग्राम उमरा, आठवडी बाजार (पो.स्टे. अकोट ग्रामीण): ६ ऑगस्ट २०२६ रोजी ४ आरोपींवर कारवाई करत ४,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण आणि इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!