
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची MD पावडर वाहतुक व विक्री करणार्या विरुध्द मोठी कार्यवाही…
पोलिस आयुक्तांचे विशेष ( सि.आय.यु) पथकाची अंमली पदार्थ एम.डी. पावडरची विक्री करणार्यावर मोठी कार्यवाही….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकित गांजा,चरस,MD यांचे विक्रीवर तसेच त्याची विक्री करणार्यांची माहीती घेऊन त्यांचेवर कजक कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना तसेच विशेष पथकास देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि. 02 जुन 2023 रोजी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने विशेष पथक (सिआययु) आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणाया इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, इसम उमेश महादेवराव मेश्राम वय 49 वर्ष रा. मिलचाळ, नवी वस्ती, बडनेरा अमरावती. हा सोबत एम.डी. नावाच्या अंमली पदार्थाचे पाउच बाळगुन तो होंडा अँक्टीवा मोटारसायकल क्र. एम.एच. 27 डी.एम. 3996 या ग्रे रंगाच्या मो.सा. ने दस्तुर नगर कडुन बियानी चौक मार्गे अमरावती येथे विक्री करण्या करीता येत आहे.


अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने नमुद ठिकाणी जावुन सापळा रचुन पो. स्टाफच्या मदतीने नमुद इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिश्यामध्ये एक पारदर्शक प्लॅस्टीक छोटी पिशवी ज्यामध्ये एम.डी. पावडर पांढ-या मळसर रंगाचे रवेदार ज्याचे वजन एकुन 25 ग्रॅम किंमत अंदाजे 1,25,000/- रु. चा माल, तसेच विवो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल कि.अ. 15,000/- तसेच होंडा अॅक्टीवा ग्रे रगाची मो.सा. क्र. एम.एच. 27 डी.एम. 3996 कि.अ. 80,000/- रु. असा एकुन 2,20,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमुद आरोपीने शासनाने बंदी घातलेला एम.डी. नामक अंमली पदार्थ जवळ बाळगला तसेच विक्री करणे करीता वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्याचेवर फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन येथे कलम 22 (ब), 8 (क), 29एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. फ्रेजरपुरा करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त परी १ सागर पाटील, सहा पोलिस आयुक्त गुन्हे कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पोहवा सुनिल लासुरकर, जहीर शेख, ना.पो.शि. अतुल संभे, पो.शि. राहुल ढंगेकर, विनोद काटकर, सुधिर गुडघे यांनी केली आहे.


