
गुन्हे शाखा युनीट १ ची अवैध गुटखा व्यवसाईकावर मोठी कार्यवाही….
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ची पो. स्टे नागपूरी गेट हद्दीत गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर छापा करुन २,११,६८०/-रु. चा गुटखा आरोपीसह घेतला ताब्यात…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्त यांनी रुजु होताच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने आज दि २८ मे २०२५ रोजी पोलिस आयुक्त, अमरावती शहर यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदयांवर रेड मोहीम राबविणेकामी गुन्हे शाखा युनीट ०१ चे अधिकारी व अमंलदार पो.स्टे. नागपूरी गेट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि डायमंड स्टार ट्रांसपोर्ट कंपनी नावाचे दुकानाचे आंत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याची साठवनूक केलेली आहे.


सदर माहीती खात्रिशीर असल्याने गजानन गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी, याना फोनद्वारे माहीती देवून पंचासह डायमंड स्टार ट्रांसपोर्ट कंपनी येथे रेड केली असता सदर ठिकाणी १४ मोठ्या आकाराचे प्लॅस्टीकचे पोते- एका पोत्यामध्ये ६ लहान पोते व लहान पोत्यांमध्ये ४२ पॅकेट असा एकूण ३,५२८ पॅकेट, प्रती पॅकेट किंमत ६०/-रु. असा एकूण किंमत २,११,६८०/-रु. चा शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल डायमंड स्टार ट्रांसपोर्ट कंपनीचे चालक आरोपी १) अब्दुल सलीम अब्दुल कादर, वय ३५ वर्षे, रा. छायानगर याचे कडे मिळून आल्याने सदर मालाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता सदरचा माल हा २) प्रवीन ठक्कर रा. नागपूर याचा असल्याचे सांगीतले

यावरुन अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांचे फिर्यादीवरुन यांचे दोन्ही आरोपींना पोलिस स्टेशन नागपूरी गेट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन नागपूरी गेट करत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त अरविंद चावरिया,पोलिस उपाआयुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर, पोलिस उपआयुक्त सागर पाटील (परिमंडळ-०१), सहायक पोलिस आयुक्त, (गुन्हे विभाग), सहायक पोलिस आयुक्त (गाडगेनगर विभाग) अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पो.उपनि. प्रकाश झोपाटे, पोहवा सतीष देशमूख, फिरोज खान, सचिन बहाळे,. प्रशांत मोहोड, अलीमउददीन खतीब, नापोशि नाझीमउददीन सैयद, विकास गुढधे, सचिन भोयर,पोशि सुरज चव्हाण, निखील गेडाम, रंजित गावंडे चालक अशोक खंगार, किशोर खेंगरे, गुन्हे शाखा युनिट क्रंमाक -०१ तसेच श्री गजानन गोरे व घनशाम दंदे अन्न सुरक्षा अधिकारी, मुकेश मोहोड अन्न व औषधी प्रशासन, अमरावती यांनी केली


