पोलिस आयुक्तांच्या पथकाचा क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा,दोघे अटकेत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती शहर- सवीस्तर व्रुत्त असे की भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा काल दिनांक १९/११/२३ रोजी अंतीम सामना अहमदाबाद येथे सुरु असतांना त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी.
वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त असलेल्या सी.आय.यु. पथकास  गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, मसानगंज मनपा शाळेजवळ अमरावती येथे

संजय नारायणराव उदापुरकर वय 51 वर्ष रा. छोटा बाजार, परतवाडा





हा छोटु ठाकुर रा. मसानगंज अमरावती याच्या घरुन इंडीया विरुद्ध ऑस्ट्रेलीया या आय. सी. सी. वर्ल्ड कप फायनल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनचे सहाय्याने तसेच मोबाईल लिंकच्या सहाय्याने बेटींग घेवुन सट्टा जुगार खेळ पैश्याची बाजी लावुन हारजितचा खेळ खेळवित आहे अशा प्राप्त माहीतीवरुन सदर ठिकाणी जावुन रेड केली असता नमुद दोन्ही आरोपी हे इंडीया विरुद्ध ऑस्ट्रेलीया या आय. सी. सी. वर्ल्ड कप फायनल क्रिकेट सामन्यावर मोबाईल मधील गुगल क्रोम मध्ये OLA bet या नावाचे ऑनलाईन बेटींग अँप या नावाचे गैरकायदेशीर सॉफ्टवेअर बनवुन लोकांना खरे आहे असे भासवुन त्या मध्ये चालु असलेल्या क्रिकेट मँचचे भावावर फोनचे सहाय्याने बेटींग करतांना मिळुन आले. तसेच त्याच्या
जवळ असलेल्या इतर मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या फोनच्या आय.सी.सी. वर्ल्ड कप फायनल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेवुन सट्टा जुगार खेळ खेळविल्याच्या रेकॉर्डींग दिसुन आल्या. यावरुन ते त्यांना बेटींग सट्टा खेळवित असुन त्या दोघांची सदर व्यवहारामध्ये काही प्रमानात  भागीदारी असल्याचे सांगीतले. प्रथमदर्शनी नमुद सट्यांच्या हीशोबाची पाहणी केली असता त्याची लाखों रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसुन आले. यावरुन ताब्यातील आरोपी



1) संजय नारायणराव उदापुरकर वय 51 वर्ष रा. छोटा बाजार, परतवाडा



2) नितीन गेंदालाल गोयल वय 31 वर्ष रा. संतोषी नगर अमरावती

यांच्याकडुन जप्ती पंचनाम्याप्रमाणे क्रिकेट सट्याचे जुगार साहीत्य खालील प्रमाणे जप्त करण्यात आले.

1)विवो कंपनीचा V 27 pro आकाशी रंगाचा मोबाईल कि.अ. 30,000/- रु.

2) सँमसंग गॅलेक्सी S 22 ultra कंपनीचा कथ्या रंगाचा मोवाईल कि.अ. 80,000/-रु

3) लावा कंपनीचा काळ्या ग्रे रंगाचा साधा मोबाईल कि.अ. 1500/- रु.

4) लावा कंपनीचा निळ्या रंगाचा साधा मोबाईल कि.अ. 1500/- रु. असा एकुन 1,13,000/-रु. चा माल जप्त करण्यात आला असुन पोलिस स्टेशन नागपुरी गेट येथे कलम 420, 465,468, 471, 34
भा.द.वि. सह कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

महत्वाचे म्हणजे यातील मुख्य आरोपी संजय उदापुरकर हा अमरावती जिल्ह्यात मुख्यत्वे ग्रामीण भागात यांचे फार मोठे नेटवर्क असल्याचे कळते तसेच नितीन गोयल हा अमरावती शहरात आपले नेटवर्क पसरतोय…

सदरची कार्यवाही  नविनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त अमरावती शहर,  सागर पाटील, पोलिस उपायुक्त परि. 1 , विक्रम साळी, पोलिस उपायुक्त परि. 2 अमरावती,शिवाजी बचाटे, सहा. पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा अमरावती यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पो.उप नि. गजानन राजमल्लु, स.पो.नि. अनिकेत कासार, पो.हे.का. सुनिल लासुरकर, विनय मोहोड, ना.पो.शि. जहीर शेख, अतुल संभे, पो. शि. राहुल ढेंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!