घरफोडी करुन पसार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 घरफोडी मधील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ शिताफीने घेतले ताब्यात….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. २३/०३/२०२४ रोजी फिर्यादी विवेक दिनकर कलोती रा. बुधवारा अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट ते त्यांची बहीनच्या घरी दि(२३) मार्च रोजी घराला लॉक करून गेले व
दि (२४)मार्च रोजी रोजी घरी परत आले असता त्यांचे घराचे दरवाजाच्या कुलुप कोंडा तुटलेला दिसला त्यावरुन त्यांनी  घराची पाहणी केली असता. घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी  ५,००,०००/-  रू  कोणी तरी अज्ञात इसमाने घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घराचे आत प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटामधील चोरून नेले. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे अप. क्र. ७०/२०२४ कलम ४५७, ३८० भा.द.वि. प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करुन तपास सुरु हेता







प्रलंबीत गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे निर्देशान्वये आयुक्तालय हद्दीत घरफोडी चे गुन्हयांना आळा बसावा आणि गुन्हे उघडकीस यावे त्याकरीता त्यांचे आदेशान्वये गुन्हेशाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे सुचनेनुसार युनिट २ चे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील फरार आरोपीबाबत गुप्त बातमीदार नेमले.



सदर गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना. गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील फरार आरोपी योगेश उर्फ अजुबा धनराज रायकवार वय २४ वर्ष रा. मसानगंज अमरावती हा मसानगंज येथे असल्याची माहीती मिळाल्यावरूंन नमुद इसमाचा मसानगंज परीसरात शोध घेवुन सापळा रचुन नमुद आरोपीस मसानगंज येथील तिसरा नागोबा ओटा येथुन त्यास ताब्यात घेवुन त्यास पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन खोलीपुरी गेट यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाव्यतीरीक्त तपासामध्ये नमुद आरोपीकडुन अजुन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.



सदरची कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त मुख्यालय- कल्पना बारावकर, सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा,  शिवाजी बचाटे,गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, पोलिस अंमलदार राजेंद्र काळे, जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, योगेश पवार, चंद्रशेखर रामटेके, नईम बेग, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!