
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन ९ मोटारसायकल केल्या जप्त…
अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ ने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याचेकडुन चोरीतील ९ मोटार सायकल एकूण किंमत ३,५०,०००/- रू चा मुददेमाल केला जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आदेशीत केले होते की , रेकॉर्ड वरील वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हेगारांना चेक करून व त्यांचेवर पाळत ठेवुन योग्य प्रभावी कार्यवाही करण्याबाबत आदेश प्राप्त झाले वरून पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण, गुन्हेशाखा युनिट २ यांचे नेतृत्वात पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमुन पोलिस आयुक्तालय हद्दीत पो. स्टॉफसह रेकॉर्ड वरील वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हेगार चेकिंग करीता पेट्रोलींग करीत असतांना. दिनांक २९/०७/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्री लायक माहीती मिळाली की, चोरी गेलेली पॅशन प्रो कंपनीची एम.एच.३०बि.व्ही. ७०१८ या क्रमांकाची गाडी एक इसम विक्री करण्याच्या उद्देशाने गांधी चौक परिसरात फिरत आहे.



त्यानुसार. गांधी चौक येथे जावुन पाहणी केली असता. एकविरा पार्किगचे गेट जवळ मिळालेल्या माहीती व वर्णना प्रमाणे एक इसम एका पॅशन प्रो काळया रंगाची गाडी क्रमांक एम.एच-३० बि.व्ही-७०१८ या गाडीवर संशईतरित्या बसून असल्याचा दिसला. पो. स्टाफचे मदतीने घेराव घालुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव दिपक शंकरराव मारवाडी, वय ३५ वर्ष, रा. वल्लभ नगर नं. २ अमरावती ह. मु. अन्नाभाऊ साठे नगर मुर्तीजापुर, जि. अकोला असे सांगितले. त्याचे ताब्यातील वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडविचे उत्तरे दिले. त्यास बारकाईने विचारपुस केली असता त्याने सदरचे वाहन हे ८ दिवसापुर्वी वल्लभ नगर अमरावती येथून चोरी केली असल्याचे सांगीतले. त्यावरून पो.स्टे. खोलापुरीगेट येथील रेकॉर्डची पाहणी केली असता अप.क. १२५/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच इतर चोरीचे मोटार सायकली बाबत विचारपुस केली असता. त्यांने कबुली दिली की, तसेच नमूद आरोपी हा मुर्तीजापुर येथे राहत असून तो अमरावती येथे येवून मोटार सायकल ची चोरी करून त्या स्वता वापरतो व काही मोटार सायकल निर्जन स्थळी लपवून ठेवतो. त्याचे ताब्यातुन अमरावती शहर येथील ३ व वाशिम येथील कारंजा लाड येथील गुन्हयातील मोटार सायकल व इतर जिल्हयातील गुन्हयातील मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. १) पेंशन प्रो काळया रंगाची गाडी ,२) टिव्हीएस स्पोर्ट काळ्या रंगाची ३) हिरो एचएफ डिलक्स ४) होंडा शाईन काळ्या रंगाची गाडी क. MH-30 BV-7018,MH-27DK-6247 ४) MH-372-1641 बजाज डिस्कवर गाडी क्रमाक एम.एच.२७ ए.के. ८०६० काळया रंगाची लाल पटटा असलेली मोटार सायकल )६हिरो होंडा रप्लेंडर काळ्या रंगाची निळा पटटा नंबर नसलेली मोटार सायकल ७)होंडा ट्यूस्टर काळया रंगाची एम.एच. १२ जी.एन. ६८२२ मोटार सायकल ८) यामाहा कंपनीची लाल रंगाची नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल ९) हिरो होंडा स्प्लेंडर काळया रंगाची नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल नमुद आरोपी दिपक शंकरराव मारवाडी, वय ३५ र्वा, रा. वल्लभ नगर नं. २ अमरावती याचे ताब्यातुन वरील प्रमाणे गुन्हयातील ०४ मोटार सायकली तसेच इतर गुन्हयातील ०५ मोटार सायकरी अशा एकूण ०९ मोटार सायकरली कि.अं. ३,५०,०००/- रू चा जप्त करण्यात आला आहे. तसेच सर्व वाहने पो.स्टे. खोलापुरीगेट येथे जमा करण्यात आले आहे. हयाव्यतीरीक्त तपासा मध्ये नमुद आरोपीकडुन अजुन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

नमूद आरोपी नामे दिपक शंकरराव मारवाडी, वय ३५ वर्ष, रा. वल्लभ नगर नं. २ अमरावती ह.मु. अन्नाभाऊ साठे नगर मुर्तीजापुर, जि. अकोला हा पो.स्टे. अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याचे विरूध्द यापुर्वी पो.स्टे. खोलापूरीगेट येथे अप.क ५८/२०१८ कलम ३७९, ३४ भादवि तसेच पो.स्टे. राजापेठ येथे अप.क. १०८/२०१९ कलम २९४, ५०४, ५०६ भादवि व अप.क. ५१६/२०१८ कलम ३०२, ३४ भादवि चे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे रमेश धुमाळ, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल कडू, सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार महेंद्र येवतीकर, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, जहीरोददीन, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, विशाल वाकपांजर, राहुल देंगेकर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, चेतन कराळे, निलेश वंजारी, संदीप खंडारे, राहुल दुबे, चेतन शर्मा यांनी केली आहे.



