अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने जबरी चोरी करणारे घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. (१७)जुन २०२४ रोजी फिर्यादी संदेश विश्वासराव मेश्राम वय २४ वर्ष रा. मोती नगर, अमरावती यांनी पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे तक्रार दिली होती की, ते मोटार सायकल ने महादेव खोरी येथुन
त्याचे घरी शांती नगर रोड ने जात असतांना अजय मंगल कार्यालय समोर येथे फिर्यादी यांना यातील आरोपी अंकुश गोंडाने रा. वडाळी अमरावती, वेदांत मेश्राम रा. यशोदा नगर अमरावती, प्रणय मेश्राम रा. संजय गांधी नगर अमरावती, रूपेश उर्फ जग्या सयाम रा. बेनोडा अमरावती यांनी थांबवुन आरोपी वेदांत मेश्राम याने त्याचे खिशातील चाकु काढुन त्याचा धाक दाखवुन त्याचे साथीदारांनी फिर्यादीस मारहान करून जबरीने फिर्यादीचे खिश्यातुन चारही आरोपीनी नगदी २८०० /- रूपये हिसकावुन घेतले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. फ्रेजरपुरा येथे अप.क्र. ५५०/२०२४ कलम ३९२, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सुरु होता





पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांचे निर्देशान्वये आयुक्तालय हद्दीत जबरी चोरी चे गुन्हयांना आळा बसावा आणि गुन्हे उघडकिस यावे त्याकरीता  गुन्हेशाखा, अमरावती शहर येथील पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे आदेशाने युनिट . २ येथील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील फरार आरोपीबाबत गुप्त बातमीदार नेमले.सदर गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडु माहीती मिळाली की, सदर
गुन्हयातील जबरी चोरी करणारे, फरार आरोपींचा शोध घेवुन फरार आरोपी क्र १) अंकुश विजय गोंडाने वय २४ वर्ष रा. वडाळी अमरावती, २) रूपेश उर्फ जग्या युवराज सयाम वय २२ वर्ष रा. बेनोडा अमरावती हे मिळुन आल्याने सदर गुन्हयात अटक करून पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे देण्यात आले.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त  कल्पना बारावकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे , सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा, शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे पोनि . राहुल आठवले , गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, पोलिस अंमलदार राजेंद्र काळे, जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार,
चंद्रशेखर रामटेके, नईम बेग, निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!