अमरावती पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यास घेतले ताब्यात,अजुन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती-)प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ , अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण
येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणनेकामी सुचना निर्गमीत केल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्था. गु.शा.  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. दिनांक ०५/११/२०२३
रोजी पोउपनि नितीन चुलपार,  मो. तस्लीम यांचे पथकातील अंमलदार हे वरुड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की,

आशिष आपकाजे रा. वरुड  हा विनाकागदपत्रे असलेली एक प्लेजर मोपेड पांढऱ्या रंगाची क्रमांक एम एच २७ बी.सी. ५२५५ ची गाडी विक्री करीता वरुड येथे लोकांना विचारपुस करीत असुन ती चोरीची असण्याची शक्यता आहे. अशा माहितीवरुन आम्ही
पथकातील अंमलदारांसह मिळालेल्या गोपनिय खबरेप्रमाणे गेलो आणि आशिष अपकाजे यास पारडी बोरांग, वरुड येथून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव





आशिष ओंकारराव आपकाने वय २० वर्ष, रा. शनिवार पेठ, वरुड ता. वरुड



असे सांगीतले. वरुन त्याचे ताब्यात असलेल्या मोपेड गाडीचे कागदपत्रांची मागणी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला त्यास आणखी विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदारासह सदरची मोपेड क्रमांक एम एच २७
बी.सी. ५२५५ शनिवारपेठ वरुड येथून चोरी केल्याचे सांगीतले. वरुन सदर मोपेड गाडी कि.अं. २२,०००/-रु  ताब्यात घेवून पो.स्टे. वरुड येथील अपराध क्रमांक ७०२/२०२३ कलम ३७९ भादंवीचा गुन्हा उघडकीस आणला. नमुद आरोपी व जप्त मुदेमाल पुढील कार्यवाहीस पोलीस स्टेशन वरुड येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अपर पोलिस अधिक्षक  शशिकांत सातव , अमरावती ग्रामीण, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. नितीन चुलपार, मो. तस्लीम शेख गफुर, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, सपोउपनि संतोष मुंदाने, पो.हे.कॉ. बळवंत दाभणे, रविंद्र बावणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पंकज
फाटे पो. कॉ. संजय गेठे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!