
अंजनगाव सुर्जी पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारी घेतले ताब्यात….
अवैध जुगारावर अंजनगाव सुर्जी पोलिसांचा छापा, १५ जुगारींना घेतले ताब्यात,३.१० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
अंजनगाव सुर्जी(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मागील काही दिवसापासुन अंजनगाव सुर्जी येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र दिसत होते त्यात तत्कालीन ठाणेदार यांचेविरुध्द बर्याच तोंडी/लेखी तक्रारी पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांना प्राप्त झाल्या होत्या तसेच तत्कालीन ठानेदार यांची नाशिक येथे बदली झाल्याने तिथे तात्पुरते रुजु झालेले सपोनि सुरज तेलगोटे यांना सदरच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते



त्याअनुषंगाने दि ०३/०८/२५ रोजी पोलिस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील अधिकारी व अंमलदार पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळालो की शिरजगाव रस्त्याने असलेल्या प्रेम रॉय यांचे शेतात काही लोक जमिनीवर गोलाकार बसून एक्का बादशाह नावाचा ५२ ताश पत्यावर पैशांची बाजी लावून जुगार खेळ खेळत आहे.

अशा मिळालेल्या माहीतीवरुन पोलिस स्टाफ व सोबत पंच असे प्रेम रॉय यांच्या शेतात गेले असता खबरेप्रमाणे १० ते १५ इसम जमिनीवर गोलाकार बसून त्यापैकी एका इसमा जवळ ताशपत्ता व इतर इसम एक्का बादशाह ताशपत्यावर पैसे टाकून मांग पत्ता जुगार खेळ खेळत असल्याचे दिसले. पंचांची व पोस्टॉफ यांची खात्री पटल्यानंतर छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी १)प्रविण भरत तायडे, वय ४३ वर्ष, रा. ग्राम हंतोडा ता. अंजनगाव सुर्जी २) संतोष चंपतराव इंगळे, वय ४२ वर्ष, रा.भिम नगर ता. अंजनगाव सुर्जी ३) शिवा उ के आकाश सहदेवराव राउत, वय २३ वर्ष, रा. मातंगपूरा, अंजनगाव सुर्जी ४) रविंद्र काशीनाथ इंगळे, वय ३५ वर्ष, रा. तहसिल रोड, अंजनगाव सुर्जी ५) रोहीत अनिल सपकाळ, वय २१ वर्ष, रा.सलीम नगर, अंजनगाव सुर्जी ६) रूधिकेश राजेंद्र नांदुरकर, वय २४ वर्ष, रा.शहापुरा, अंजनगाव सुर्जी ७) प्रदीप किसनराव विजयकर, वय २४ वर्ष, रा. शहापुरा, अंजनगाव सुर्जी ८) राजु प्रल्हाद कोटेकर, वय ३० वर्ष, रा.डोरपुरा, अंजनगाव सुर्जी ९) शेख जाकीर शेख इब्राहीम, वय ३८ वर्ष, रा.संघई शाळेजवळ अंजनगाव सुर्जी १०) मनोज अशोक गोर, वय २७ वर्ष, रा. भोईपूरा, अंजनगाव सुर्जी ११) दिपक जगदोश कनोजीया, वय ३० वर्ष, रा. संघई शाळेजवळ, अंजनगाव सुजी १२) शरिफ खा शफी खा वय ४७ वर्ष, रा. भालदारपुरा, अंजनगाव सुजी १३) विवेक उर्फ विक्की श्रीकृष्ण मोरे, वय २४ वर्ष, रा. भोईपुरा, अंजनगाव सुजी १४) प्रमोद सेवकराम इंगळे, वय ३२ वर्ष, रा. शहापुरा, अंजनगाव सुर्जी १५) राहुल प्रकाश इंगळे, वय २६ वर्ष, रा. पानआटाई, अंजनगाव सुर्जी या सर्व इसमांना ताब्यात घेण्यात आले

तसेच सदर पकडलेल्या इसमांकडून नगदी अंदाजे २१,१००/- रू. ५२ ताशपत्ते अंदाजे कि १००/-, व पाच मोटार सायकल कि अं ३,१०,०००/- असा एकूण ३,३१,०००/- रू नगदी व साहोत्य मिळून आल्याने सदर मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवून कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आंनद अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अंजनगाव सुर्जी डॅा शुभम कुमार, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार सपोनि सुरज तेलगोटे पोलिस स्टेशन, अंजनगाव सूर्जी यांचे नेतृत्वात पोशि रवि राठोड, आकाश रंगारी, अमित घाटे, शुभम मारकंड, प्रमोद चव्हाण, युवराज सोळंके, मोहसीन पठाण, चालक पो.कॉ. अक्षय शेळके, विलास रावते यांनी केली



