
गोडाऊनमधुन रासायनिक खतांची चोरी करणारी टोळी धामणगाव पोलिसांचे ताब्यात…
रासायनिक खताच्या बॅग चोरणारी टोळी दत्तापुर पोलिसांनी केली जेरबंद,आरोपींना मुद्देमालासह घेतले ताब्यात….
दत्तापुर(धामणगाव) अमरावती – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ११/०४/२०२५ रोजी तकारदार विठठल लींबाजी काबंळे वय ४८ वर्ष रा. प्लॉट नं. ४३ इस्तारी नगर उमरसरा यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दत्तापुर येथे तक्रार दिली की दिनांक ३१/०३/२०२५ ते दिनांक १०/०४/२०२५ चे सायंकाळी ०४/३७ वा पुर्वी दाभाडा रोड जुना धामणगाव येथील गोडाउन कोणीतरी अज्ञात चोरटयाने गोडाउनचे मागच्या बाजुच्या १५ फुट उंचावरील खिडकीच्या वर असलेला टीनाचा पत्रा तोडुन आत प्रवेश करून गोडाउन मधील कोरोमंडळ कंपनीच्या खताच्या २०, २०, ०, १३ च्या १०६ बॅग प्रत्येकी बॅग कीमंत १३००/- रूपये प्रमाणे अशा एकुण १०६ बॅग खताच्या की. १३७,८००/- रूपयेचा माल चोरून नेला. अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन दत्तापुर येथे अपराध क १०२/२०२५ कलम ३०५, ३३४ (१) भारतीय न्याय संहीता २०२३ गुन्हा नोंद करून तपास सुरु होता


सदर गुन्हयाचा सखोल व कसोशीने तपास करून यातील आरोपींना निष्पन्न करुन आरोपी १) अनिकेत मोहन कथलकर वय २३ वर्ष रा. विरूळ रोघे २) प्रणव राजेश कांबे वय १९ वर्ष रा. विरूळ रोघे ३) दिनेश शंकर पुसनाके वय २२ वर्ष रा. नांरगावंडी ४.) नंदु लक्ष्मण कोराम वय २७ वर्ष रा. नारगावंडी ५) प्रविण शिवदास वानखडे वय ३४ वर्ष रा. विरूळ रोघे ६) अक्षय किशोर रोंघे वय ३३ वर्ष रा. विरूळ रोघे यांना अटक करून त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेल्या कोरोमंडळ कंपनीच्या खताच्या २०, २०, ०, १३ च्या एकुण ९० बॅग की. १,१७०००/- रूपये व खताच्या बॅग नेण्याकरीता वापरण्यात आलेले वाहन टाटा एस गाडी क एम एच ४७ ई०२१४ की. २,००,०००/- रू चे जप्त करण्यात आले असा एकुण ३,१७,०००/- रूपयेचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. विशाल आंनद,अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गिरीष ताथोड, पोउपनि नरेन्द्र मानकर, पोहवा नवनाथ खेडकर, अतुल पाटील,सागर धापड हरीहर वैदय , नापोशि पवन हजारे, पोशि पवन महाजन यांनी केली



