
धारणी शहरात छापा टाकुन LCB ने गांजा केला जप्त,दोन आरोपींना घेतले ताब्यात….
धारणी शहरात दोन ठिकाणी गांजा (अंमली पदार्थ) बाबत छापा टाकुन एकुण १० किलो गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा ची कार्यवाही….
धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,
पोलिस अधिक्षक विशाल आनंद, यांनी आगामी काळात होणा-या
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधधंदे करणा-यांवर जास्तीत जास्त केसेस करुण अवैधधंदयांना आळा बसावा याकरीता अधिनस्त अधिकारी यांना मार्गदर्शन करुण आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने दि. २२/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पो.स्टे. धारणी हददीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना विश्वसनीय गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, शेख तस्लीम शेख उस्मानरा. दुबई मोहल्ला, धारणी व राजु टिकाराम हरसुले रा. ग्राम टिंग या रोड, धारणी हे त्यांचे राहते घरी अवैधरित्या गांजा (अंमली पदार्थ) ची विक्री करीत आहेत.
अशा खबरेवरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने N.D.P.S कायदयाचे कार्यवाही नियमावली प्रमाणे राजपत्रित अधिकारी, दोन शासकिय पंच यांचे समक्ष गोपनिय खबरेप्रमाणे राजु टिकाराम हरसुले वय ३४ वर्ष रा.टिंग-या रोड, धारणी यांचे घरी जावुन झडती घेतली असता त्याचे घरातुन ६ किलो ७५८ ग्रॅम किल३३,७९०/-रु चा गांजा (अंमली पदार्थ) मिळुन आला. तसेच सददाम उर्फ शेख तस्लीम शेख उस्मान वय २७ वर्ष रा. दुबई मोहल्ला, धारणी याचे घराचे झडतीत ३ किलो २६० ग्रॅम कि. १६,३००/- रु गांजा (अंमली पदार्थ) मिळुन आला. दोन्ही आरोपीकडुन एकुण १० किलो १८ ग्रॅम कि.५०,०९०/- रु चा गांजा (अंमली पदार्थ) मिळुन आल्याने सदरचा गांजा माल रितसर जप्त करुण दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात येवुन त्यांचे विरुध्द अनुक्रमे अपराध क्र.१८५/२०२४ व १९० / २०२४ कलम ८ (क), २० ( ब ) ii (ब), N.D.P.S कायदयान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन धारणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक.पंकज कुमावत, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक. किरण वानखडे यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचीन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविन्द्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, वृषाली वाळसे, चालक निलेश येते यांनी केली.



