
भंडारा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगारास केले तडीपार…
भंडारा– गणेशोत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाहीचे सत्र सुरु केले आहे त्यानुसार धम्मराज नेमीचंद मेश्राम, वय 22 वर्ष, रा. सेलोटी, ता.लाखनी जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस
स्टेशन लाखनी परीसरातील मौजा सेलोटी येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. धम्मराज नेमीचंद मेश्राम हा सन 2016 पासुन विविध गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस ठाणे लाखनी, साकोली, कारधा, भंडारा येथे जबरीचोरी, सरकारी कर्मचारी हमला, चोरी, घरफोडी, खंडणी वसुली करणे, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे 18 गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये धोकादायक व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते. अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात धम्मराज नेमीचंद मेश्राम रा. सेलोटी ता. लाखनी जि. भंडारा (महाराष्ट्र) याचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास दिनांक 21/09/2023 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन भंडारा कारागृहात दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री. लोहित मतानी व अपर पोलिस अधीक्षक . ईश्वर कातकडे, सहायक पोलिस अधीक्षक सुशांत सिंग यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक (स्थागुशा) नितीनकुमार चिंचोळकर, पोलिस निरीक्षक, लाखनी . मिलींद तायडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधीर मडामे, पो.ना.
अंकोश पुराम, पोहवा सुभास राठोड यांनी केली.


