नजीकच्या जिल्ह्यातुन अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर SDPO पथकाची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकाची अवैधरित्या  दारूची वाहतुक करणार्यावर नाकाबंदी करुन जप्त केला दारुचा साठा….

हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन उत्सवाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते की नजीकच्या जिल्ह्यातुन येणारा अवैध दारुसाठ्यावर लक्ष ठेऊन कार्यवाही करा त्याअनुषंगाने दि 11/08/25 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पो उप नि अजय अवचट यांना दोन इसम कळंब येथुन दारुची चोरटी वाहतुक करताय







अशा सदरच्या गोपनीय माहीतीवरुन मौजा वडनेर येथील आजनसरा चौक येथे पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी केली असता पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 35 P 4532 मध्ये कळंब येथून अवैध देशी व विदेशी दारू घेऊन वडनेर कडे  अवैध देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या गाडीला थांबण्याचा इशारा दिला असता कार चालकांनी त्याच्या ताब्यातील कार थांबवून त्याच्याकडील कारचा दरवाजा उघडून आरोपी हिरा कोहचाडे, राहणार कळंब, जि येवतमाळ हा शेत शिवारातून पडून गेला व एक इसम हा कारच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला मिळून आला त्यास त्याचे नाव विचारले असतात त्याने पवन संजय महल्ले वय 20 वर्ष, रा. दत्त रोड ,कळंब जिल्हा यवतमाळ असे सांगितले, यावरुन वरून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट vdi कार क्रमांक MH 35 P 4532 किंमत 4,00,000/ व देशी/विदेशी दारू किंमत 96,000/ रु असा जु की 4,96,000/- रु चा माल मिळुन आल्याने , पो स्टे, वडनेर येथे  आरोपी विरूध्द गुन्हा  दारुबंदी काय्द्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशील कुमार नायक यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी  हिंगणघाट यांचे कार्यालयातील . पो.उप.नि अजय अवचट,पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतीश घवघवे,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, गोविंद हदवे व अनंत हराड यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!