
नागपूर ग्रामीण पोलीस कारवाई: १४३ किलो डोडा पावडरसह ३ जण अटकेत, ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: १४३ किलोहून अधिक ‘डोडा पावडर’सह ३ जण अटकेत, २८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
नागपूर ग्रामीण:
नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि बोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १४३ किलो २८३ ग्रॅम डोडा पावडर (अंमली पदार्थ) आणि इतर साहित्य असा एकूण ३९,२५,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कारवाईचा घटनाक्रम व तपशील:
-
पहिली कारवाई (बुटीबोरी परिसर):

दिनांक १०/११/२०२६ रोजी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलीस स्टेशन बोरीचे पथक हिंगणा-बुटीबोरी मार्गावरील हळदगाव बस थांद्या जवळ गस्त घालत होते. यावेळी एका संशयित महिंद्रा बोलेरो वाहनाची (क्र. आर.जे.-२१/जी.एफ.-२६४२) पंचांसमक्ष झडती घेतली असता, वाहन चालक महेंद्र झुमराराम खदाव (वय २५ वर्ष, रा. राजस्थान) याच्याकडून ११२३ ग्रॅम डोडा पावडर व वाहन असा एकूण १०,२७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

-
माहितीचे धागेदोरे आणि मुख्य हॉटेलवर धाड:
तपासादरम्यान आरोपीने हा अंमली पदार्थ ‘चौधरी राजस्थानी ढाबा, कारंजा घाडगे, जि. वर्धा’ येथील मालक पप्पू चौधरी याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. तसेच त्याच्या मोबाईलवरून युपीआय (UPI) द्वारे ऑनलाइन पेमेंट केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे दिनांक ११/११/२०२६ रोजी पोलिसांनी त्या ढाब्यावर छापा टाकला.


-
आरोपी व जप्त केलेला माल:
छाप्यादरम्यान हॉटेलमधून १४२ किलो १५१ ग्रॅम डोडा पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी:

-
पप्पू मोडाराम चौधरी (वय ३५ वर्ष, रा. राजस्थान, सध्या रा. चौधरी राजस्थानी ढाबा, कारंजा घाडगे – हॉटेल मालक)
-
हडमानराम चिमाणाराम सारण (वय ३० वर्ष, रा. राजस्थान – हॉटेल कूक)
या दोघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून १४२ किलो १५१ ग्रॅम डोडा पावडर (किंमत २४,४३,०२० रुपये), मोबाईल, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक वजन काटा व कॅल्क्युलेटर तसेच नगदी रक्कम असा एकूण २८,९८,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-
पोलिसांचे मार्गदर्शन:
सदर यशस्वी कारवाई हर्ष ए. पोदार (वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा), अनिल म्हस्के (अपर पोलीस अधीक्षक) आणि मयंक माषव (सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक व पोलीस स्टेशन बुटीबोरी मार्फत संयुक्तरीत्या पार पाडण्यात आली. या गुन्ह्यात आणखी इतर आरोपींचा शोध व बँकॉर्ड व फॉरवर्ड लिंकेजबाबतचा तपास सुरू आहे.



