
डिसीपी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलिसांची मोठी कारवाई: एमडी ड्रग्स आणि गांजासह तीन तस्करांना बेड्या; हैदराबाद कनेक्शन उघड

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत हैदराबाद कनेक्शन उघड: हुडकेश्वरमध्ये ६० हजारांचे एमडी ड्रग्स आणि गांजा जप्त
महाराष्ट्र शासनाच्या नागपूर शहर पोलीस आयुक्तांतर्गत परिमंडळ क्र. ४ च्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात एक अत्यंत यशस्वी आणि धडक कारवाई केली आहे. पोलीस उप आयुक्त (DCP), परिमंडळ क्र. ४, नागपूर शहर रश्मिता राव एन. यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनिय व खात्रीशीर माहितीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा यशस्वी छापा टाकण्यात आला.

दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ०३:०२ वाजताच्या सुमारास, हुडकेश्वर हद्दीतील सर्वश्री नगर, दिघारी चौक येथील आयुषी अपार्टमेंटमध्ये ही कारवाई पार पडली. हैदराबाद येथून आलेल्या एका तस्कराकडून गांजा आणि ड्रग्सची डिलिव्हरी घेतली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून नमुद ठिकाणी धाड टाकली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे एकूण २,४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे:

-
एम.डी. (मेथेंडॉन ड्रग्स): १२.५८० ग्रॅम वजनाच्या एकूण ८ पुड्या (अंदाजे किंमत ६०,०००/- रुपये)

-
गांजा: १००० ग्रॅम (अंदाजे किंमत ३०,०००/- रुपये)
-
मोबाईल फोन: विवो (आकाशी रंग), रिअलमी (निळा रंग), पोको (सिल्वर रंग) आणि एक सॅमसंग कंपनीचा किपॅड मोबाईल, असे एकूण चार मोबाईल (किंमत अंदाजे ३१,०००/- रुपये)

-
वाहन: सुजुकी बर्गमन दुचाकी (क्र. एम.एच. ४९ सी.यु ८३४२, किंमत अंदाजे १,२०,०००/- रुपये)
आरोपींची माहिती व गुन्हेगारी पार्श्वभूमी:
या प्रकरणी पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली असून, त्यांच्यावर पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे एन.डी.पी.एस. ॲक्टच्या (NDPS Act) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे:

-
राजिक अली रफिक अली (रा. आझाद कॉलनी, निराला सोसायटी, बारा खोली जवळ, बडा ताजबाग, नागपूर)मेहमुद खान वल्द गुलाम खान (रा. आयुषी अपार्टमेंट, सर्वश्री नगर, दिघारी चौक, हुडकेश्वर, नागपूर)
-
पी. राज करण वल्द पोतालन राजु (रा. ३५-८०/४०, मधुरा नगर, नेरेडमेट, मलकजगिरी, हैदराबाद)
विशेष पोलीस पथकाची कामगिरी:
सदर धडक व कौतुकास्पद कारवाई पोलीस उप आयुक्त (परि. क्र. ४) रश्मिता राव एन. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे व त्यांच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने यशस्वी केली. या पथकामध्ये पोलीस हवालदार गोपाल देशमुख ,संदीप पाटील, दिनेश गाडेकर, चेतन वैद्य,विजय सिन्हा पोलीस अंमलदार प्रज्वल वाणी तसेच महिला अंमलदार रोषनी भोयर, मिना जुनघरे आणि ज्योति क्षिरसागर यांचा समावेश होता.



