नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाने अवघ्या दोन तासांत आरोपीला आवळल्या बेड्या!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ३ लाख ५० हजारांची फसवणूक; नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाने अवघ्या दोन तासांत आरोपीला आवळल्या बेड्या!

  • घटनेची पार्श्वभूमी व तक्रार:  नागपूरमधील शांतीनगर येथील व्हीएचबी कॉलनीत राहणारे ७३ वर्षीय फिर्यादी गोपाल पांडुरंग निमजे यांना मधुमेहाचा (डायलिसिस/मधुमेह) त्रास असून त्यांच्या दोन्ही पायांना सूज होती. ते दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी वैयक्तिक काмяनिमित्त रानी दुर्गावती चौक येथे गेले असताना तिथे त्यांना दोन अनोळखी इसम भेटले. त्यातील एकाने आपले नाव ‘अरुण’ असल्याचे सांगत, त्याच्या वडिलांनाही असाच त्रास होता आणि हरिद्वार येथील एका डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केल्यामुळे ते बरे झाल्याचे सांगितले. उपचारासाठी त्यांनी फिर्यादीचा पत्ता व मोबाईल नंबर घेतला.





  • फसवणुकीची पद्धत:  दुसऱ्या दिवशी (२७ ऑक्टोबर २०२६ रोजी) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण डॉक्टर असल्याचे भासवून “मी तुमच्या उपचारासाठी घरा जवळ आलो आहे,” असे सांगितले. फिर्यादीने त्यांना घरी बोलावून उपचार करून घेतला. त्या वेळी आरोपींनी फिर्यादीच्या पायात पस (पिवळा पू) झाला असून तो काढण्यासाठी १०० कांड्या लागतील असे सांगून, प्रति कांडी ३,५०० रुपये प्रमाणे एकूण ३,५०,०००/- (तीन लाख पन्नास हजार) रुपये मागितले. फिर्यादीने घरातील रोख ३,५०,०००/- रुपये त्यांना दिले व ते इसम पैसे घेऊन निघून गेले.



  • फसवणूक लक्षात आल्यानंतर:  उपचारानंतरही फिर्यादीला कोणताही आराम मिळाला नाही. फिर्यादीने त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता तो मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३१८(४), ३(५) भारतीय न्याय संहितेनुसार (भान्यासं.) गुन्हा नोंदवला.



  • पोलिसांची धडक कारवाई व अटक: गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला निष्पन्न करून मोहम्मद बब्लू मोहम्मद सलिम (वय ४० वर्षे, रा. गाव बुंदी, जि. कोटा, राजस्थान) यास अवघ्या दोन तासांच्या आत ताब्यात घेतले.

  • जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:  आरोपीकडे चौकशी केली असता त्याने आपल्या मोहम्मद सलाम नुरुद्दीन (वय ४५ वर्षे, रा. बुंदी, राजस्थान) नावाच्या साथीदारासोबत संगनमत करून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण ४,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध व पुढील तपास शांतीनगर पोलिसांकडून सुरू आहे.



  • मार्गदर्शन:  ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन)  दीपक अग्रवाल आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे)  वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!