खापरखेडा हत्या प्रकरण: २०१५ मधील अपहरण व खून प्रकरणातील फरार वॉण्टेड आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


खापरखेडा हत्या प्रकरण: खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेला वॉण्टेड आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात; २०१५ मधील अपहरण व खून, तसेच जबरी चोरीची गुन्ह्याची दिली कबुली

नागपूर:

नागपूर ग्रामीण भागातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित खून प्रकरणातील तब्बल काही काळापासून फरार असलेला मुख्य पाहिजे (वॉण्टेड) आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनीतांत्रिक तपासाच्या आधारे धडक कारवाई करत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले असून, चौकशीदरम्यान त्याने इतरही गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे.





काय आहे नेमकी घटना?

दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास, फिर्यादीचा भाऊ प्रशांत मुकुेश घोडेस्वार (वय ३२, रा. वार्ड क्र. ४, खापरखेडा, नागपूर) हे खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीतील वार्ड क्र. २, गांवेडे कॉम्प्लेक्ससमोर आपला चायनीज ठेला चालवत होते. यादरम्यान, आरोपी सुधीर उर्फ चेप्या पिपळे, सागर माहुुरकर, कासिम अयूब पठाण, सुलतान रहीत गडकनोजे, आनंद शिंदे, आशिश भड आणि प्रशांत चौधरी यांनी संगनमत केले. चायनीज ठेला हटवण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी फिर्यादीच्या भावाला धारदार शस्त्राने बेदम मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली होती.



या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (भादंवि) कलम ३०२, ३४ सहकलम ४, २५ शस्त्र कायदा आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या गुन्ह्यात १ ते ६ क्रमांकाच्या आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र आरोपी प्रशांत उर्फ सोनु शंकर चौधरी हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून फरार होता व पोलिसांच्या वॉण्टेड लिस्टमध्ये होता.



गुन्हे शाखेची धडक कारवाई आणि तांत्रिक तपास

गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्र. ६ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास व मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पाहिजे आरोपी प्रशांत उर्फ सोनु शंकर चौधरी (वय ३४, रा. दत्तनगर, मुन्ना गॅरेजजवळ, वार्ड क्र. २, खापरखेडा, नागपूर) याला खापरखेडा हद्दीतील चनकापूर, डब्लूसीएल कॉलनी येथून ताब्यात घेतले.

पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपीने वरील खुनाचा गुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली. तसेच चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस आले असून:



  • सन २०१५: पोलीस ठाणे देवळी, जि. वर्धा येथे दाखल असलेला अपहरणासह खुनाचा गंभीर गुन्हा.

  • सन २०१९: पोलीस ठाणे खापरखेडा, जि. नागपूर येथे दाखल असलेला जबरी चोरीचा गुन्हा.



    हे दोन्ही गुन्हे आपणच केल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला खापरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मार्गदर्शन आणि पोलीस पथक

सदरची उल्लेखनीय कामगिरी नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)  राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सह. पोलीस आयुक्त (गुन्हे) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. ६ चे पोनि. भरत कन्नड, सपनि. सचिन गायकवाड, पोउपनि. राहुल रोटे, सफौ. मुकेश खांडरे, पोअं. दिनेश महल्ले, सुनील यादव व चापोहवा. चंद्रशेर भारती यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!