गडचिरोलीत मोठी कारवाई: माओवाद्यांचे स्फोटक साहित्य आणि शस्त्रे जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई: माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे जप्त

गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत धडक कारवाई करत माओवाद्यांचे घातपाताचे मोठे मनसुबा उधळून लावले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील वांगेतुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माचुवंचा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रसाठा आणि स्फोटके पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

मुख्य मुद्दे:

  • गोपनीय माहिती आणि विशेष मोहीम: गडचिरोली जिल्ह्यातील मौजा माचुवंचा जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथका (C-60) च्या ४ तुकड्या आणि बीडीडीएस (BDDS) चे १ पथक शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.





  • घटनास्थळावरून जप्त केलेले साहित्य: जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, जमिनीखाली लपवून ठेवलेले खालीलप्रमाणे घातक साहित्य व शस्त्रे हस्तगत करण्यात आली:



    • १२ नग क्लेमोर



    • १ नग १२ बोअर रायफल

    • ३ नग सिंगल शॉट रायफल



    • १ नग एअर गन

    • १ नग बॉटल IED स्फोटक आणि १ नग जिवंत क्लेमोर स्फोटक



    • १ सेट वायरलेस माईक सेट

    • १ नग हत्याराचा लोअर हँडगार्ड आणि १०० नग सुतळी बॉम्ब

    • ५ जोड्या हिरव्या रंगाचे माओवादी गणवेशाचे कापड व इतर साहित्य

  • घटनास्थळीच विल्हेवाट: जप्त केलेल्या साहित्यापैकी २ स्फोटके व इतर माओवादी साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

कारवाईमागील पार्श्वभूमी व नेतृत्व:

गडचिरोली जिल्ह्यात माओवादाचा प्रभाव आता संपत चालला असून नागरिक दहशतीतून मुक्त होत आहेत. तथापि, भूतकाळात सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी हे साहित्य दुर्गम भागात गोपनियरित्या जमिनीखाली पुरून ठेवले होते.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांच्या आदेशान्वये आणि अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता)  हर्षवर्धन बि. जे. व पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सहभागी सर्व पोलीस अधिकारी व जवानांचे कौतुक केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!