
बायोडीझलची अवैधरित्या विक्री करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,मुद्देमाल जप्त….
अवैधरित्या बायोडीजलची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे
शाखेची धडक कारवाई,3200 लि. बायोडीजलसह 5,86,700/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन 07 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला…..
मलकापुर(बुलढाणा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायिकांवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.



सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
सुनिल अंबुलकर यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन, जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे लगत अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायिकांची गोपनीय माहिती काढून, त्यांना वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सुचित केले. सदर आदेशाचे अनुषंगाने पो.स्टे. मलकापुर शहर व पो.स्टे. एम आय डी सी दसरखेड हद्दीत स्थागुशाचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन दि. 27/09/2025 रोजी
पोलिस स्टेशन मलकापुर शहर हददीत धरणगांव शिवारातील हॉटेल फौजी धाव्याचे बाजुला अवैध बायोडिझेलचा साठा जमीनीमध्ये पुरलेल्या लोखंडी टाक्यामध्ये केलेला असुन स्वता:चे फायदयासाठी विक्री करीत आहे. अशा गोपनिय माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे पथकाने पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय मलकापुर यांचे सह सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी 1) सय्यद अब्दुला सय्यद याकुब, वय 37 वर्षे रा. पारपेठ, ता.मलकापुर, यास ताब्यात घेवुन सदर ठिकाणावरुन 1200 लिटर बायो डिझेल व इतर साहित्य असा एकूण- 2,64,700/-रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

तसेच आरोपी 1) सय्यद अब्दुला सय्यद याकुब, वय 37 वर्षे रा.
पारपेठ, ता.मलकापुर, 2) शेख इम्रान शेख इस्माईल, रा बारादरी, मलकापुर यांचे विरुध्द पोलिस स्टेशन मलकापुर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस स्टेशन मलकापुर शहर करीत आहेत.

त्याचप्रमाणे पोलिस स्टेशन दसरखेड, एम आय डी सी, हददीत रनथम शिवारातील हॉटेल एकता समोर अवैध बायोडिझेलचा साठा जमीनीमध्ये पुरलेल्या लोखंडी टाक्यामध्ये केलेला असुन स्वता:चे फायदयासाठी विक्री करीत आहे. अशा गोपनिय माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे पथकाने, पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मलकापुर यांचे सह सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी इम्रान खान फिरोज खान, वय 20 वर्षे रा. बेरजाली मैदपुर जि. उज्जैन, मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन सदर ठिकाणावरुन 2000 लिटर बायो डिझेल व इतर साहित्य असा एकूण- 3,22,000/-रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी 1) इम्रान खान फिरोज खान, वय 20 वर्षे रा. बेरजाली मैदपुर जि. उज्जैन, मध्यप्रदेश, 2) लखन पांचाळ, रा. जमुनीया शंकर रतलाम, मध्यप्रदेश 3 ) शाकीर खान मास्टर रा. मैदपुर जि.उज्जैन, मध्यप्रदेश, 4) मो. नईम शेख रा. मेहरुन जळगांव, 5) अरशद तेली रा. गुजरात, यांचे विरुध्द पोलिस स्टेशन दसरखेड, एम आय डी सी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा दोन्ही गुन्हयातील एकुण 3200 लीटर बायोडिझेल व साहित्य असा एकुण 5,86,700/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास कारवाई पो.स्टे. दसरखेड, एम आय डी सी करीत आहेत.
सदरच्या दोन्ही कार्यवाही पोलिस अधिक्षक. निलेश तांबे यांचे आदेशाने ,अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड,अपर पोलिस अधिक्षक खामगाव श्रेणीक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात पोउपनि, अविनाश जायभाये, पोउपनि पकंज सपकाळे,
पोहवा. दिपक लेकुरवाळे,शेख चांद,गणेश पाटील, पोशि गजानन गोरले, चालक पोशि निवृत्ती पुंड स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने केली.



