
स्थानिक गुन्हे शाखेची MD. ड्रग्ज संबंधाने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली कार्यवाही,६.२५ ग्रॅम MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….
मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ MD मेफेड्रॅान वरील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,6.25ग्रॅम MD पावडरसह एकास घेतले ताब्यात…
बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात पोलिस अधीक्षक. निलेश तांबे यांचे संकल्पनेतून दिनांक 26/06/2025 पासून अंमली पदार्थांविरुध्द “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत असून, मिशन परिवर्तन अंतर्गत अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर करण्यात येत आहे.



तसेच जिल्ह्यात रासायनिक व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक करुन, त्यांना अंमली पदार्थं संबंधाने गोपनीय माहिती काढून त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते.


त्या अनुषंगाने दि.25/09/2025 रोजी स्थनिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन मलकापूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम संशायास्पद स्थितीत फिरतोय त्यानुसार सदर ठिकाणी गेले असता पोलिसांची गाडी पाहून पळून जात असतांना मिळून आला. वरुन सदर ईसमास पकडून, त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहसीन ईजाज सैय्यद वय 27 वर्षे, ह. मु. पारपेठ गुरुव्दारा जवळ, मलकापूर जि. बुलढाणा.मुळ राहणार. शाहूनगर चाळ, मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे असे सांगीतले यावरुन अंगझडती घेतली असता, त्याचेजवळ आरोग्यास अत्यंत हानीकारक असे 6.25 ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) मिळून आले.सदर आरोपीचे ताब्यातुन 1) एम. डी. ड्रग्ज (मॅफेड्रॉन ड्रग्ज) वजन 6.25 ग्रॅम किं. 31,400/-रु.2) मोबाईल एक नग किं. 10,000/-रु.एकूण किं. 41,400 /- रु. चा मुद्देमाल.जप्त करण्यात आला सदर ईसमाविरुध्द पो.स्टे. मलकापूर श. येथे एन.डी.पी.एस. अॅक्टचे कलम 8(क),22(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो.स्टे. मलकापूर शहर. करीत आहेत
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निलेश तांबे,अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत पोउपनि. अविनाश जायभाये, पोहवा दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोशि. गजानन गोरले, मपोशि. आशा मोरे, चानापोशि सुरेश भिसे नेमणूक स्था.गु.शा. बुलढाणा, पोशि ऋषीकेश खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांचे पथकाने केली.



