मेहकर पोलिस स्टेशन हद्दीतुन चोरीस गेलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखा यांनी शिताफीने केला हस्तगत…
मेहेकर(बुलढाणा) – सवीस्तर व्रुत्त असे की फैजल शाह अयाज शाह वय 22 वर्षे, रा. ईमामवाडा चौक, मेहकर यांनी दि. 24/10/2023 रोजी रात्रीचे सुमारास त्यांचे मालकीचा ट्रक क्रमांक- MH-30-AV-1134 हा वरद सर्वो पेट्रोलपंप येथे पाकींग करून ठेवला होता. सदरचा ट्रक कोणीतरी अज्ञातांनी चोरुन नेला. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मेहकर येथे गुरनं. 618/2023 कलम 379 प्रमाणे नोंद करुन तपास सुरु असतांना पोलिसांना गोपनिय माहीती
मिळाली की सदरचा ट्रक हा
1) अकबर शहा इसाक शहा वय 27 वर्षे,
(2 ) सैयद समीर सै. नासीर वय 31 वर्षे
३) सैय्यद सिकंदर सैयद अब्दुल मन्नान वय 34 वर्षे,
४) सैयद जुनेद सैयद अहमद वय 31 वर्षे,
५) ईरफान खान अयुब खान वय 22 वर्षे,
६) सादिक शेख जानी वय 30 वर्षे, सर्व राहणार- छत्रपती संभाजीनगर यांचे ताब्यात आहे त्याअनुषंगाणे(अ.क्र.01 ते 06 आरोपी यांना पो.स्टे. मेहकर यांच्या ताब्यता पुढील कायदेशीर कारवाईकामी देण्यात आले आहे.)
*त्यांच्या ताब्यातुन
(1) गुन्ह्यात चोरीस गेलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक किं. 10,00,000/- रुपये
(2) महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही 500 कार किं. अं. 12,00,000/- रुपये
असा एकूण 22,00,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी . सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात- अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी. बी महामुनी – अपर पोलिस अधीक्षक- बुलढाणा, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी
स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा, पोनि. . राजेश शिंगटे, पोउपनि. सैय्यद हारुण पो.स्टे. मेहकर, पोलीस अंमलदार सफौ. सुधाकर
काळे, पोना. अनंता फरताळे स्था.गु.शा. बुलढाणा., सफौ. अशोक गाढवे, पोहेकॉ. सदानंद चापले, पोकॉ. करीम शहा सर्व नेमणूक
पो.स्टे. मेहकर पथकाने केली आहे.