
धुळे स्थागुशाने अट्टल घरफोड्यास केले जेरबंद…
घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला धुळे एलसीबीने केली अटक…
धुळे (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक करण्यात स्थागुशा (एलसीबी) पोलिसांना यश मिळाले आहे. देवपूर पोलिस स्टेशन भाग-5 गु.र.नं. 77/2024 भादंवि क.457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात फिर्यादी यांचे चांदीचे दागिने व रोख रुपये व मोबाईल असे चोरीस गेले होते. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय एस.शिंदे, नेमणुक स्था.गु.शा. धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संशयित ईसम नामे 1) योगेश महेश थोरी (वय 23 वर्षे), रा.संतोषी माता चौक, कल्याण भवन जवळ धुळे याने केला असुन त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने वरील गुन्हयाची कबुली दिली आहे.


अशा प्रकारे देवपूर पोलिस स्टेशन भाग-5 गु.र.नं. 77/2024 भादंवि कलम 457, 380 हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असुन 1) योगेश महेश थोरी (वय 23 वर्षे),रा.संतोषी माता चौक कल्याण भवन जवळ धुळे यास निष्पन्न करुन त्याच्याकडून 57,700/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन पुढील कारवाईकामी देवपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत पुढील तपास चालु आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक, धुळे किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दत्तात्रय शिंदे, पोउपनि बाळासाहेब सूर्यवंशी, सफौ संजय पाटील, पोहवा संतोष हिरे, चेतन बोरसे, मुकेश वाघ, रविकिरण राठोड, सुरेश भालेराव, पंकज खैरमोडे, प्रकाश सोनार, पोना शशीकांत देवरे, पोशि सुशिल शेंडे, निलेश पोतदार, अमोल जाधव, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील यांनी केली आहे.



