
धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…
गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा….
धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून सदरचा सेल हा गो तस्करी करणाऱ्या आरोपींवर पोलिस स्टेशन मार्फत होणाऱ्या प्रतिबंधक कारवाया ज्यात मोक्का, MPDA, हददपार सारख्या कारवाया गुन्हयात वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा परवाना निलबंन, गोवंश वाहतूक, गो मांस विक्रीची ई गोपनीय माहिती काढून संबंधीत पोलिस ठाण्यांस कारवाईसाठी कळविणे, विविध गो रक्षक संघटनांशी योग्य समन्वय ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरीता पोलिस स्टेशन कडून योग्य ती कार्यवाही करून घेणे हा या गोरक्षक सेलचा मुख्य उददेश आहे.
यानुसार पोलिस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे व अपर पोलिस अधीक्षक, किशोर काळे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गोरक्षक सेल चे कामकाजावर पर्यवेक्षण ठेवणारे स्थानिक गुन्हे शाखा, धुळे चे पोलिस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हयातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेशी समन्वय साधून गो तस्करी करणारे एकुण ४५ आरोपीतांविरूध्द फौ.प्र.सं.क १०७ प्रमाणे कारवाई केली असून गोवंश वाहतूक करणाऱ्या एकुण ३० वाहनांचा परवाना रदद होणे बाबत संबंधीत प्रादेशीक परिवहन अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एका पेक्षा जास्त गुन्हयात सक्रीय असलेल्या आरोपीतांच्या गुन्हयातील सहभागानूसार मोक्का, MPDA, हददपार या प्रमाणे नजीक च्या काळात
कारवाया करण्यात येणार आहेत. गो वंश वाहतूक, गो मांस विक्री, गो हत्या या सारखे प्रकार आढळून आल्यास संबंधीत पोलिस
स्टेशन किंवा गोरक्षक सेल यांना या बाबत माहिती देणे बाबत पोलिस अधीक्षक, श्रीकांत धिवरे यांनी याद्वारे आवाहन केले आहे. गोरक्षक सेल चे अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे
१) पोलिस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे – मो.नं. ९४२३१७७९४४
२) पोलिस उप निरीक्षक, प्रकाश पाटील – मो.नं. ९८२३८१३५९९
३) पोलिस हवालदार रविंद्र माळी- मो.नं. ९८२३८०३१५१
४) पोलिस हवालदार संदीप पाटील – मो.नं. ९९२३३७२७७५
५) पोलिस हवालदार भिमराव बोरसे – मो.नं. ७०८३९८१८६४
६) नायक पोलिस शिपाई- मनोज बागूल – मो.नं. ९०४९७७१८०२


या सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांची गोरक्षक सेलमधे नेमनुक करण्यात आली असुन गोतस्करी संबंधी काही गुप्त माहीती असल्यास आपण दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधुन देऊ शकता आपले नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधिक्षक श्रीकांत शिंदे यांनी केले आहे



