देसाईगंज पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे केले जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

देसाईगंज(गडचिरोली)-  जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणा­यांवर  पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारच दिनांक 04/09/2023 रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपनीय  बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र. टी. एस. 12 यु.ए. 0789 यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता, वाहनामध्ये तेलंगना येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेली एकुण 18 गोवंशीय जनावरे मिळून आली. त्यामुळे त्यातील

1) मोहम्मद जाकीर मो. इब्रााहीम रा. चंगेमुल,





2) गंजय अरुण किस्टया रा. मेडीपल्ली दोघेही राज्य (तेलंगना),



3) नरेश नागदेव पारधी,



4) रविंद्र दयाराम कुथे

दोघेही रा. गांधीनगर तह. देसाईगंज जि. गडचिरोली

यांचे ताब्यातील ट्रक क्र. टी.एस. 12 यु.ए. 0789 किंमत अंदाजे रु. 16,00,000/- व 18 गोवंशीय जनावरे किंमत अंदाजे 1,90,000/- रुपये असा एकुण 17,90,000/- रुपये किंमतीचा माल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास परि. पोउपनि. प्रविण बुंदे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार  चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली साहील झरकर यांचे मार्गदर्शनात व देसाईगंज येथील पोनि. श्री. किरण रासकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!