
स्थागुशा पथकाने केला मोहा हातभट्टी गावठी दारुनिर्मिती कारखाना उध्वस्त….
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उध्वस्त करुन एकुन 4 लाखाचा मुद्देमाल केला नष्ट.…..


गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्यासंदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील अवैध चोरटी दारु विक्रेते, साठवणुकदार, हातभट्टी दारू निर्मिती करणारे, तसेच वाहतुक करणा-या विरुध्द धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असुन जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत प्राप्त होणा-या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे प्रभावी छापा कारवाई करून अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात येत आहे

या अनुषंगाने दिनांक 6.4.2024 रोजी जिल्हयातील पोलिस ठाणे तिरोडा हद्दीतील मौजा सिल्ली येथे अवैधरित्या हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा तयार करून मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची निर्मिती करणारा सराईत गुन्हेगार संजय सोविंदा बरईकर हा अवैधरित्या एका शेतात दारू निर्मितीचा अड्डा/ कारखाना लावून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हातभट्टी दारू निर्मिती करीत आहे.अश्या प्राप्त माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा घालून प्रभावी कारवाई केली असता मौजा सिल्ली येथील अशोक राहांगडाले यांचे शेतशिवार बांद्यात 3 गॅस सिलेंडर, 3 शेगडी ज्यावर 3 मोठे लोखंडी ड्रम, लाकडी टवरे, प्लास्टिक पाइपच्या सहाय्याने सडवा मोहफुल रसायनाचा वापर करून हातभट्टी दारू निर्मिती करीत असताना तीन इसम मिळून आल्याने दारु निर्मिती अड्डा घटनास्थळावर- 3 नग जुने वापरते एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर, 3 नग जुन्या वापरत्या लोखंडी गॅस शेगड्या, 3 नग लोखंडी ड्रम, अंदाजे 90 लीटर मोहफुलाची तयार केलेली हातभट्टी दारु, 3 नग जर्मन घमेले, 3 नग लाकडी टवरे, 3 नग प्लास्टिक पाईप, 2 नग 200 लिटरचे प्लास्टिक ड्रम, 2 नग 100 लिटरचे प्लास्टिक ड्रम, सडवा मोहफुल रसायनानी भरलेल्या 97 नग प्लास्टिक झील्ली/पोत्यामध्ये 3880 किलो सडवा मोहपास रसायन, दारू वाहतुक करीता वापरती एक शेंदरी रंगाची टिव्हिएस ज्युपीटर कंपनीची दुचाकी जिचा वाहन क. एम.एच 35 एव्हि 9118 असा एकूण किंमती 4, लाख 40 हजार 900/-रु चा मुद्देमाल अवैद्यरित्या दारू निर्मिती करीत असताना मिळुन आल्याने जप्त करण्यात आला तसेच दारू निर्मितीचा संपुर्ण अड्डाच उध्वस्त करण्यात आलेला आहे

सदर अवैधरित्या हातभट्टी दारू निर्मिती प्रकरणी आरोपी १)योगेश्वर चैतराम नेवारे वय 45 वर्ष रा. बोरी ता. मोहाडी, जिल्हा -भंडारा २)रामपुरी भागवत गंगधरीया वय 36 वर्ष रा. सिल्ली ता. तिरोडा जि. गोंदिया ३)दिगंबर आसाराम भलावी वय 60 वर्ष रा. सिल्ली ता. तिरोडा जि. गोंदिया आणि.हातभट्टी निर्मितीचा अड्डा चालविणारा मुळ मालक पाहिजे असलेला आरोपी 4) संजय सोविंदा बरईकर रा. सिल्ली ता.तिरोडा, जिल्हा-गोंदिया यांचे विरूध्द पोलिस ठाणे तिरोडा येथे अपराध क्र. 251/2024 *महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ब), (क), (ड), (ई), (फ), अन्वये* गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कायदेशीर कारवाई तिरोडा पोलिस करीत आहेत..
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोउपनि महेश विघ्ने, अर्जून कावळे, पोहवा भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, पो.शि. संतोष केदार यांनी केलेली आहे..


