येळाकेळी येथील बोगस डॅाक्टरचा उच्छाद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सेलु तालुक्यात बोगस डॅाक्टरांचा सुळसुळाट,येळाकेळी येथे बोगस डॅाकटरचा गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ….

वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की येळाकेळी येथील मुख्य रस्त्यावर बस स्थानकाजवळ गोपाल भटेरो नामक एक ईसम राजरोसपणे गेल्या १० वर्षापासुन वैद्यकिय व्यवसाय थाटुन बसलाय आणि आरोग्य विभाग नुसते मुंग गिळुन बसलाय आणि आर्थिक व्यवहारातुन त्यांना अशा बेकायदेशीर लोकांना वैद्यकिय व्यसाय करण्याची मुभा दिल्याचे निर्दशनास येते







आमचे प्रतिनिधी अधिक खोलात जावुन सदरहु गोपाल भटेरो नामक बोगस डॅाक्टर विषयी अधिक चौकशी केली असता सदरचा ईसम हा येळाकेळी शिवाय त्याचे राहते गावी वडगाव कला, शिरसमुद्रपुर,टाकळी,महाबळा व सुरगाव येथेही व्यवसाय करीत असल्याचे कळते



सदर ईसमाबाबत खोलात जावुन चौकशी केली असता हा ईसम १० वर्षाआधी एका औषध कंपनीत कामाला असल्याचे कळते महत्वाची बाब म्हनजे सदर ईसमावर आजपावेतो आरोग्य विभागाची एकही कार्यवाही नाही



म्हनजे हे सर्व तालुका आरोग्य अधिकारी सेलु यांचे आशिर्वादाने चालतय हे म्हनने वावगे ठरणार नाही

उद्याच्या भागात या बोगस डॅाक्टरचे कारनामे….





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!