
वर्धा मार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार मुलगी थोडक्यात..
वर्धा मार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार मुलगी थोडक्यात..
हिंगणा – भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरून जात असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असणारी 13 वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली. तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघाताची ही घटना जामठा शिवारात वर्धा मार्गावर घडली. दिलीप डोमाजी लेंडे (वय 45) आणि पत्नी सारिका लेंडे (वय 40, रा. संताजीनगर, बुटीबोरी) अशी मृतांची नावे आहेत.


लेंडे दाम्पत्य सकाळी मुलगी लावण्या हिला उपचारासाठी
नागपूरला घेऊन जाण्यासाठी निघाले. दिलीप
मोटरसायकल चालवित होते. जामठा शिवारातून जात
असताना बेलेजा सर्व्हिस सेन्टर समोर मागून येणाऱ्या
भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर तिघांनाही
लांबवर फरफटत नेले. यात दिलीप आणि सारिका यांचा
घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगी लावण्या जखमी
झाली. रस्त्याने जाणारे वाहनचालक थांबवून मदतीला
धावले.

माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन
तेलरांधे यांच्यासह हिंगणा पोलिसांचा ताफा घटनास्थळी
दाखल झाला. नागरिकांच्या मदतीने जखमी मुलीला
खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी
पाठविण्यात आले. घटनेनंतर ट्रकचालक वाहन सोडून
पसार झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.



