परीविक्षाधिन पोलिस अधिकाऱ्याचा जुगार अड्ड्यावर छापा,२५ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे अवैध जुगारावर धाडसत्र. 25 आरोपी विरुद्ध 2 गुन्हे दाखल. 6 लाख 8 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त…..

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील विवेकानंद व गांधी चौक पोलिस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून पत्त्यावर तिर्रट जुगार खेळणारे व खेळवणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.
१ फेब्रुवारी व २ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाणे विवेकानंद चौक व गांधीचौक हद्दीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये,तसेच रूम मध्ये काही इसम पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी मळवटी गावात, लायक शेख यांचे शेतात तसेच कोल्हे नगर,लातूर येथील अजित देशमुख यांच्या घरात छापेमारी करून बेकायेशीररित्या पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेल्या एकूण 25 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख 8 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस ठाणे विवेकानंद चौक व गांधीचौक मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 4, 5 ,12(अ) कायद्यान्वये प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





1) शुजाऊदीन मैनोदीन बागवान,वय-43 वर्षे, रा. हत्ते नगर, लातूर.



2) सुरज कमलाकर सुर्यवंशी, वय- 26 वर्षे, रा. कोल्हे नगर, लातूर.



3) अरविंद सटवाजी धावारे, वय-24 वर्षे,रा. राहुल नगर, लातूर.

4) संतोष लक्ष्मण राऊत, वय-35 ,वर्षे रा. साळे गल्ली, लातूर.

5) अजहर शौकत शेख, वय-31 वर्षे, रा. कोल्डे नगर, लातूर.

6) पवन चंद्रकांत औरादे, वय-30 वर्षे, रा. मजगे नगर, लातूर.

7) शिवाजी संभाजी ठाबरे, वय-45 वर्षे, रा. देशपांडे गल्ली, लातूर.

8) महेश श्यामराव ढगे, वय-48 वर्षे, रा. राहुल नगर, लातूर.

9) संतोष ज्ञानोबा कुटवाडे वय-42 वर्षे, रा. सोनवती ता. जि. लातूर.

10) समद अख्तरअली सय्यद वय-30 वर्षे, रा. आनंद नगर, लातूर.

11) अक्रम रशीदसाब शेख, वय-30 वर्षे,रा. गौसपुरा, लातूर.

12) युनूस युसुफसाब मोमीन ,वय-45 वर्षे ,रा. बौध्द, लातूर.

13) नसीर इब्राहीम कुरेशी, वय 33 वर्ष, रा. कुरेशी मोहला, लातुर.

14) मुस्तकीम जाकीर कुरेशी, वय 24 वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, लातुर.

15) संकेत दुर्गनाथ पारसे,वय 28 वर्ष, रा. बाभळगाव, लातुर.

16) सतीश विश्वंभर मस्के, वय 43 वर्ष, रा. बाभळगाव, लातुर.

17) अतुल पंढरीनाथ कटके, वय 26 वर्ष,रा. राजीव नगर, लातूर.

18) विलास लक्ष्मण शिंदे, वय 24 वर्ष रा. संत गोरोबा सोसायटी, लातूर.

19) रोहीत शिवाजी श्रीमंगले,वय 19 वर्ष, रा. महादेव नगर, लातुर.

20) अविनाश लालासाहेब कांबळे, वय 24 वर्ष, रा. राजीव नगर, लातुर

21) गोरोबा दगडु कांबळे, वय 50 वर्ष रा. सिद्वेश्वर चौक, लातुर.

22) अहनद सत्तार पठाण, वय 38 वर्ष रा. पोचम्मा गल्ली, लातुर.

23) पंकज आनिल शिंदे, वय 33 वर्ष रा. सिद्धेश्वर नगर, लातुर.

24) बबन कदम, रा.कोल्हे नगर लातूर.(फरार)

25) अजित देशमुख रा. कोल्हे नगर लातूर.(फरार)

असे असून वरील आरोपी पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून १,२ फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस अवैध धंद्यावर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक.सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलिस अधिकारी/अंमलदार यांनी  केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!