कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह

मुंबई – मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात
शौचालयाच्या कचरा कुंडीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहेत.





मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात टाकून देण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मध्यरात्री झालेला असून काही व्यक्ती शौचालयात गेल्या असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच एका नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा की मुलाचा मृतदेह आहे, याबद्दल संशय आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत याची माहिती तात्काळ कळवली. उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करुन नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा मृतदेह असल्याचे घोषित केले. परंतु कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याकरिता सायन पोलीस ठाणे यांना याबाबत कळवण्यात आले.



रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सायन पोलीस ठाणे यांना माहिती दिली. मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात (दि.८ डिसेंबर) रोजी तक्रार दाखल झाली. त्या नंतर सायन पोलिसांनी रुग्णालयात प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. कोणी अज्ञाताने नवजात बालिकेचा मृतदेह शौचालयाच्या कचऱ्यात टाकून दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!