गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन पकडला ९२ किलो कांदा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची जरीपटका हद्दीत  अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कामगिरी,४ आरोपींसह ९२ किलो गांजा केला जप्त….





नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१९)सप्टेंबर २०२४ चे रात्री ९ ते ११  वा. चे दरम्यान गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे जरीपटका हद्दीत आर्यनगर परीसरात अंमली पदार्थ गांजाची देवानघेवान होणार आहे अशा गोपनीय  खात्रीशीर माहीतीवरून, पाळत ठेवुन पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत खाली प्लॉट नं. १२, आर्यनगर, जरीपटका, नागपूर येथे गांजाची देवान घेवान करतांना आरोपी १) उमरेखान अब्दुल रशीद खान, वय ३० वर्षे, २) सौ. दरक्षा अंजुम उर्फ राणू खान उमेर खान वय २९ वर्ष दोन्ही रा. कांजीहाऊस चौक, रमाईनगर, यशोधरानगर, नागपूर ३) शेख रिजवान शेख युनूस वय २४ वर्ष रा. ईस्लामीक चौक, जुनी वस्ती बडनेरा, जि. अमरावती ४) अब्दुल आरीफ वल्द अब्दुल खालीक वय ३२ वर्ष, रा. आजरी माजरी बाबा दिवान मस्जिद जवळ, यशोधरानगर, नागपूर हे शेवरोलेट क्रुझ कार क. एम.एच १२ जि.जी ०४०० व टाटा हेक्झा कार क. एम.एच ४९ बी. बी ०६११ ने येवुन त्यांचे गाडयांमध्ये गोण्या भरतांना समक्ष मिळुन आले.



नमुद गोण्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये ९३ किलो १२० ग्रॅम गांजा किंमती अंदाजे १८,६२,४००/- रू. चा दिसुन आला. आरोपींचे ताब्यातुन गांजा, चार वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन व नमुद दोन्ही वाहने असा एकुण किंमती अंदाजे ४१,०२,४००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींची अधिक विचारपुस केली असता, नमुद गांजा हा पाहीजे आरोपी ५) मोहम्मद जुनैद ईब्राहीम राजवानी, वय ३१ वर्षे, रा. शिवनगर, यशोधरानगर, नागपुर ६) काशीफ अहमद रा. ताजनगर, जि. अमरावती, ह.मु., जाफर नगर, नागपूर याचे मदतीने सदर अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करीत असल्याचे सांगीतले.



यातील आरोपी क्र ५ मोहम्मद जुनैद ईब्राहीम राजवानी, वय ३१ वर्षे, रा. शिवनगर, यशोधरानगर, नागपुर याचा शोध घेवुन त्यास सुध्दा ताब्यात घेतले. आरोपींचे हे कृत्य कलम ८ (क), २० (ब), (२) (क), २९ एन.डी. पी.एस. कायद्यानुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे जरीपटका येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी क्र १ ते ५ यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर करून त्यांची दिनांक २३.०९.२०२४ पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. तसेच पाहिजे असलेला आरोपी क्र ६ काशीफ अहमद रा. ताजनगर, जि. अमरावती, ह.मु., जाफर नगर, नागपूर याचा शोध सुरू आहे. सदर आरोपींचा गुन्हे अभिलेख तपासला असता, आरोपी क्र  १ उमरेखान अब्दुल रशीद खान, वय ३० वर्षे, याचेविरूध्द अग्नीशस्त्र बाळगणे, शरीराविरूध्द चे गुन्हे तसेच, त्यास सन २०१८ साली ०१ वर्षाकरीता नागपुर शहर व ग्रामीण हद्दीतुन हद्दपार केल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपी क्र २ सौ. दरक्षा अंजुम उर्फ राणू खान उमेर खान वय २९ वर्ष दोन्ही रा. कांजीहाऊस चौक, रमाईनगर, यशोधरानगर, नागपूर हिचेविरूध्द शस्त्र बाळगणे, मारहाण करून जखमी करणे, अश्लील शिवीगाळ करून धमकी देणे असे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपी क्र ४ अब्दुल आरीफ वल्द अब्दुल खालीक वय ३२ वर्ष, रा. आजरी माजरी बाबा दिवान मस्जिद जवळ, यशोधरानगर, नागपूर याचे विरूध्द एन.डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपी क्र ५ मोहम्मद जुनैद ईब्राहीम राजवानी, वय ३१ वर्षे, रा. शिवनगर, यशोधरानगर, नागपुर याचे विरूध्द सुध्दा अपहरण करून जबरी संभोग करणे याबाबत गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. त्याचप्रमाणे क्र ६ काशीफ अहमद रा. ताजनगर, जि. अमरावती, ह.मु., जाफर नगर, नागपूर याचे विरूध्द एन.डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. वरील नमुद आरोपी क. १,२,४,५ व ६ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंघल, अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त(डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे) अभिजीत पाटील,  यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सपोनि. मनोज घुरडे, पोहवा. विजय यादव, मनोज नेवारे, शैलेष डोबोले, नितीन साळुंके, पवन गजभिये, विवेक अढाऊ, मपोहवा. अनुप यादव, नापोशि गणेश जोगेकर, अरविंद गेडेकर, पोशि. रोहीत काळे, सहदेव चिखले, शेषराव रेवतकर व सुभाष जगभिये यांनी केली.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!