कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांचे वाहन केळवद पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात…

केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक-17 रोजी रात्री पोलिस स्टेशन केळवद हद्दीत पथकासह नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली व मिळालेल्या खबरे वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट येथे दिनांक-18 रोजी रात्री 01/00 वाजता मौजा खुर्सापार आर.टी.ओ चेकपोस्ट येथे पांढुर्णा (मध्यप्रदेश) कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे वर स्टॉपसह नाकाबंदी करीत असताना एक सिल्वर रंगाची शोअरलेट कार क्र एम.एच-31 सी.एस. 8162  हिला नाकाबंदीचे ठिकाणी थांबविण्याचा ईशारा केला असता सदर कार चालकाने आपले ताब्यातील कार हि नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता नागपुर च्या दिशेने पळु लागला सदर कारचा सरकारी वाहनाने पाठलाग केला असता सदर कार चालकाने आपले ताब्यातील कार ही रोडच्या कडेला काही अंतरावर सोडुन अंधाराचा फायदा घेउन पळुन गेला





सदर कारची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर कार मध्ये 4 जीवंत गाई गौवंश व 2 नग बैल गौवंश असे अत्यंत क्रुर व निर्यदयतेने वाहनात डांबुन दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपु-या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैद्यरित्या वाहतुक करताना मिळुन आले यावरुन सदर शोअरलेट कार क्र एम.एच- 31 सी.एस. 8162 चा चालका विरुद्ध पोलिस स्टेशन,केळवद येथे  कलम-279 भा.द.वी सहकलम- 11(1)(घ) (ड) (च) प्राण्यांना निर्देयतेने वागविने प्रतिबंधक अधिनियम 1960 सहकलम- 5 (अ), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सहकलम-119 म.पो.का. सहकलम-184 मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे वाहन,4 गाई,2बैल असा एकुन 2,90,000/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा.पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद सहाय्यक  पोलिस निरीक्षक राकेश साखरकर, सफौ किशोर ठाकरे,पोहवा दिनेश काकडे,सुधीर यादगिरे,नापोशि दिपक ईंगळे,पोशि धोंडु देवकाते, मपोशि हेमलता भागवत, चासफौ गुणेश्वर डाखोडे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!