धक्कादायक – सख्ख्या बहिनीनेच दिली भावाच्या खुनाची सुपारी..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने बहिणीनेच काढला भावाचा काटा…

नागपूर (प्रतिनिधी) – प्रेमात अडसर होणाऱ्या आणि सतत मारहाण करत असल्याने बहिणीने आईच्या मदतीने प्रियकराला भावाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. स्थानिक गुन्हे शाखा यांनी व रामटेक पोलिसांनी रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत खिंडसी तलाव येथे अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवकाची ओळख पटवून हत्याकांडाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी मृताची आई, बहीण, बहिणीचा प्रियकर आणि आणखी एकाला अशा चौघांना अटक केली.





या बाबत अधिक माहिती अशी की, रामटेक हद्दीतील खिंडसी तलावामध्ये (दि.१७एप्रिल) रोजीच्या पहाटेस एक २५ ते ३० वर्ष वयोगटातील अनोळखी युवकाचे प्रेत अर्धनग्न अवस्थेत रामटेक पोलिसांना मिळून आले. सदर प्रेत शवविच्छेदना करीता रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदना दरम्यान सदर युवकाचा गळा दाबून त्याला जिवे ठार केले व त्यानंतर त्याला तलावामध्ये फेकून दिल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. त्यामुळे सदर युवकाचा खून करुन त्याच्या खूनाचे रहस्य उलगडू नये या उद्देशाने त्याला खिंडशी तलावात फेकून दिले असे निदर्शनास आल्याने नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सदर रहस्यमयी खुनाचे गुढ उकलण्याकरीता तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून रामटेक पोलिसांची २५ पथके व स्थानिक गुन्हे शाखेचे ५ असे विवीध तपास पथके तयार केले. अनोळखी युवकाचे दोन्ही हातावर “RAJAT, R.K., मॉ aa” अश्या अक्षरांनी गोंदविलेले होते. तसेच हातावर काही ठिकाणी हार्ट व तिन स्टार अश्या चिन्हांचे टॅटू काढलेले दिसून आले. त्यामुळे या ओळखचिन्हांचे आधारे मृतकाची ओळख पटविण्याकरीता त्याचे शारिरीक वर्णनासह शोधपत्रिका तयार करुन वृत्तपत्रामध्ये माहिती प्रसारित करण्यात आली. सोशल मिडीयाव्दारे माहिती वायरल केली, नागपूर ग्रामीण जिल्हा, नागपूर शहर भागात तसेच लगतचे जिल्हे भंडारा, गोंदीया, वर्धा, चंद्रपूर तसेच मध्यप्रदेश येथील शिवनी, बालाघाट, जबलपूर, रिवा, कटनी, छिंदवाडा, पांढुर्णा आणि छत्तीसगढ येथील राजनांदगांव, डोंगरगांव, भिलाई, रायपूर येथील पोलिस स्टेशन मध्ये जावून हरविलेल्या इसमांचा रेकॉर्डची तपासणी करुन मृतकाची ओळख पटविण्याचे काम केले. तसेच तांत्रीकदृष्ट्या तपास सुरु करुन तपास पथकातील पोलिसांनी  निरंतर रात्रंदिवस गुन्हा उघडकीस आणण्याकरीता शर्तीचे प्रयत्न सुरु केले.



याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकास माहिती मिळाली की, वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या बातमीतील मृतकाचे अंगावर गोंदविलेले वर्णन पाहुन आशिर्वाद नगर, हुडकेश्वर नागपूर येथे राहणारे श्रीमती दिपाली उघडे व त्यांची मुलगी आभा उघडे या नागपूर शहरातील कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये रजत कैलास उघडे वय (२६ वर्षे ) रा.आशिर्वाद नगर, नागपूर हा हरविला असल्याची तक्रार देण्यास आले आहे. तपास पथकाने श्रीमती दिपाली कैलास उघडे (वय ५४ वर्षे) व त्यांची मुलगी आभा उघडे वय २८ वर्ष हिचेसोबत संपर्क साधला व त्यांना मृतक युवकाचे फोटो दाखविले असता मृतक हा त्यांचा मुलगा रजत असल्याची ओळख दिपाली उघडे यांनी व त्यांची मुलगी आभा यांनी पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मृतक रजत हिची आई व बहीन आभा हिला रजत बाबत विचारपुस केली असता रजत (दि.१६एप्रिल) पासून घरी आला नाही असे त्यांनी सांगीतले की, रजत दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने तो घरी कुणालाही न सांगता बरेच दिवस घरुन गायब रहात असायचा याकारणामुळे रजतची आई व बहीन यांनी तो हरविला असल्याची आजपावेतो तक्रार दिली नाही असे पोलिसांना सांगीतले. रजत याच्या मृत्युची बातमी कळल्यावर त्याची आई व बहीन यांची वागणुक तसेच त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव अतिशय सामान्य दिसून आल्याने दोघी विषयी पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली पोलिसांना आता रजतच्या मृत्युमागे काहीतरी गुढ दडले आहे अशी खात्री वाटू लागली. पोलिसांनी तातडीने रजतच्या जवळच्या मित्रांची माहिती काढून त्यांचेकडे विचारपुस सुरु केली. तेव्हा पोलिसांना कळाले की, रजत मागील ६ महिण्यापासुन घरीच होता. दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने कामधंदा करीत नव्हता. दारुच्या नशेत असल्यावर तो घरच्यांना खूप त्रास देत होता. त्याचे घरचे लोक त्याचे त्रासाला कंटाळले होते. खात्रीशिर माहिती हाती लागल्यावर पोलिसांनी आभा व तिची आई हिच्याकडे रजत बाबत सखोल चौकशी केली तेव्हा दोघींही वेगवेगळ्या घटना सांगुन पोलिसांची दिशाभुल करीत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सरते शेवटी आभा हिचेवर अधिक संशय बळावल्याने तिची कसून चौकशी केली. तिचा मोबाईल फोन तपासून तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला असता अत्यंत महत्वपुर्ण माहिती पोलिसांचे हाती लागली. आभा हिचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई व भावाकडे तिच्या मुलासोबत रहायची. तांडापेठ येथे राहणारा अतुल राजू भामोडे वय ३१ वर्ष याचेसोबत आभा हिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. यावरुन अतुल भामोडे याला विचारपुस करण्याकरीता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना माहिती दिली की, (दि.१४एप्रिल) रोजी आभा ही स्वामीनारायण मंदीर वाठोडा येथे अतुल याला भेटली व त्याला सांगीतले की, रजत दारु पिवून आल्यावर आम्हाला खूप त्रास देवून मारहान करतो. त्याच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहे, तु त्याचे काहीतरी कर,अतुल याला प्रेयसीचा त्रास सहन झाला नाही. त्याने तिला सांगीतले की, दोन तिन दिवस थांब मी त्याचे काहीतरी करतो.



(दि.१६एप्रिल) रोजी रजत नेहमी प्रमाणे दारु पिवून आला व घरातील सामान फेकून तमाशा सुरु केला. त्यावेळी त्याने
त्याची आईला मारहाण केली. आभाची सहनशिलता पुर्णपणे संपली होती तिने त्याचक्षणी अतुल भमोडे याला फोन करुन रजत याने केलेल्या तमाशाची माहिती दिली व त्याला म्हटले की, आजच याचे काहीतरी कर, याला संपवून टाक तुला वाटेल तर मी पैसे देते. अतुल याला पैश्याची आवश्यकता तर होतीच शिवाय त्याला प्रेयसीला रजतच्या त्रासातुन बाहेर काढायचे होते. अतुल याने लगेच त्याचा मित्र पप्पू श्यामलाल बुरडे, (वय २८ वर्षे) रा.कळमना, नागपूर हयाला सर्व प्रकार सांगीतला व आपल्या मदतीला घेतले. अतुल याने त्याचदिवशी पप्पू याला मोटरसायकल घेवून रजतच्या घरी पाठविले व रजतला दारु पिण्याचा बहान करुन सोबत घेवून येण्यास म्हटले. त्यानंतर अतुल याने रजतची आईला फोन करुन सांगीतले की, पप्पू जवळ काही पैसे दया. पप्पू हा रजतच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने पप्पू जवळ ५०००/- रुपये दिले व रजतला पप्पु सोबत पाठविले. पप्पू हा रजत याला घेवून अतुल याचेकडे आला. त्यानंतर अतुल याने रजत व पप्पू यांना दिवसभर आपल्या सोबत ठेवले. यादरम्यान अतुल याने रजतला दारु पाजली, दारु पिल्यावर अतुल, पप्पू आणि रजत मोटर सायकलने म्हाळगी नगर चौक नागपूर येथून रामटेक येथे आले. अतुल याला रजतला जिवे ठार मारण्याऐवजी त्याचे हातपाय तोडून त्याला धडा शिकवावा असे वाटू लागले म्हणुन त्याने रजतची आई व बहीन यांना फोन केला व सांगतीले की, रजत याला खूप दारु पाजली आहे, तो खूप नशेत आहे त्याला जिवे ठार मारत नाही त्याऐवजी त्याचे हातपाय तोडतो. परंतु रजतची बहीन आभा हिने रजत याला संपवून परत ये। तो परत आल्यावर आम्हाला खूप त्रास देईल असे अतुल याला सांगीतले. शेवटी अतुल याने प्रियसीच्या म्हणन्यानुसार रजत याचा गळा दाबवून त्याला ठार केले. दारुच्या नशेत असल्याने रजत कडून विरोध झाला नसल्याने अतुल याने सहजरित्या रजतला संपविले. त्यानंतर अतुल याने त्याचा मित्र पप्पू याचे मदतीने रजतचा मृतदेह खिंडशी तलावात फेकून दिला. यानंतर अतुल आणि पप्पू हे दोघे आभा हिला भेटायला त्यांच्या घरी गेले व आभा आणि तिच्या आईला रजत याला जिवे ठार केल्याची माहिती दिली. त्यावर आभा हीने अतुल याला ५०००/- रुपये दिले. ते पैसे अतुल आणि पप्पू यांनी आपसात वाटून घेतले. अतुल आणि पप्पु हे सराईत अपराधी असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान माहिती मिळून आली. भावाच्या त्रासाला कंटाळून बहीणीने प्रियकराला खुनाची सुपारी दिली या रहस्यमयी घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पोलीसांनी दिवसरात्र सतत तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कामगिरी ही नागपूर ग्रामीणचे पोलीिस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे,पोलिस निरीक्षक प्रशांत काळे प्रभारी रामटेक पोलिस स्टेशन,सहा.पोलिस निरीक्षक, किशोर शेरकी, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बटूलाल पांडे, पोशि ज्ञानेश्वर राऊत, दिनेश आधापूरे, इक्बाल शेख, विनोद काळे, प्रमोद भोयर, संजय बांन्ते, रोशन काळे, नितेश पिपरोदे, रोहण डाखोरे, मिलींद नांदुरकर, अरविंद भगत, मयुर ढेकळे, अमृत किनगे, विपीन गायधने, विरेन्द्र नरड, संजय भरोदीया, सतिष राठोड, राकेश तालेवार, नितु रामटेके, अमोल कुथे, सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार तसेच पोलिस स्टेशन रामटेकचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, हरीश्चंद्र मोरे, पोलीस अंमलदार अमोल इंगोले, मंगेश सोनटक्के, धिरज खंते, योगेश कुईटे, प्रफुल रंबई यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!