प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारे सावनेर पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, २ आरोपीसह  एकुण ८,२९,५२० /- रू चा मुद्देमाल केला जप्त….

नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिले होते त्या अनुषंगाने दि.(३०)रोजी पोलिस स्ऱ्टेशन सावनेर येथील पथक हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की मध्यप्रदेश राज्यातुन केळवद मार्गे स्विफ्ट डिझायर गाडी क एमएच ४९ बि डब्लु ७६०८ या पांढ-या रंगाच्या गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व गुटख्याची वाहतुक होणार आहे अशा खात्रीशीर माहीतीवरुन सावनेर पोलिसांना लागलीच  सदर माहीतीचे अनुषंगाने कारवाई करण्याकरीता पथक पाठविण्यात आले. अंदाजे ४.०० वा दरम्यान मौजा केळवद, पांढुर्णा रोड टि पाईंट वरील ओव्हर ब्रिज सावनेर येथे नाकाबंदी करीत असतांना काही वेळात सदर क्रमांकाची गाडी येतांना दिसली त्या गाडीला थांबवुन सदर गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये दोन इसम मिळुन आले. त्यांना त्याचे नाव, गाव, विचारले असता चालक याने आपले नाव  पंकज नत्थुजी इटनकर वय ३८ वर्ष व त्याचा भाऊ  २. पवन नत्थुजी इटनकर वय ३४ वर्ष दोन्ही रा. प्लॉट क्र १२८/अ नेताजी नगर, भंडारा रोड नागपुर असे सांगितले, गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये व मागच्या सिटवर छोट्या मोठ्या अश्या एकुण १५ प्लास्टीक बो-या दिसल्या, त्याची पाहणी केली असता बोरीमध्ये २२ प्रकारचे वेगवेगळे सुगंधीत तंबाखु व गुटखा एकुण वनज १३१ किलोग्रॅम कि १,२९,५९०/रू चा माल व स्विफ्ट डिझायर गाडी क एमएच ४९ बि डब्ल्यु ७६०८ कि ७,००,०००/रू असा एकुण ८,२९,५२० /- रू चा माल जप्त करण्यात आला.
सदरचा सुगंधीत तंबाखु व गुटखा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असल्याने लगेच अन्न व औषध प्रशासन विभाग चे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती स्मिता बाभरे यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन सावनेर येथे अप क्र ४५७/२४ कलम ३२८, २७२, २७३,१८८, भादवि सहकलम २६ ( १ ), २६(२),(iv), २७(३)(e),३०(२)(a), सहवाचन कलम ३ (१) (zz), (iv), अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन दोन्ही आरोपींना ३ दिवसाची पोलिस कोठडी मा न्यायालयाने मंजुर केली आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राउत, मंगला मोकासे, ग्रेड पो उपनि राजु कडु, सफौ गणेश रॉय, पोहवा अविनाश बाहेकर, रवि मेश्राम, पोशि दाउद शेख, दिपक जोगेकर यांनी पार पाडली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!