किनवट ATM रोकड चोरी प्रकरणी बॅंकेचे कर्मचारीच निघाले खरे सुत्रधार,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 15,60,500/-  रुपयाचा मुददेमाल केला जप्त….

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मालाविरुध्दचा गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत नवनियुक्त पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.





त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन. किनवट येथे नोंद असलेला गुरनं 235/2024 कलम 303(2),306 ‘भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या ATM मशीन मधील 500 रुपये दराच्या 3479 नोटा ज्याची एकूण रक्कम 17,39,500/- रुपये अज्ञात चोरट्याने त्यातील कॅसेटसह मशीन मधून चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सदर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा यांनी सपोनि संतोष शेकडे यांचे अधिपत्याखाली एक पथक किनवटला रवाना केले होते. सदर पथकाने किनवटला जावून पो.स्टे. किनवट येथील तपासी अधिकारी पोउपनि सागर झाडे व त्यांचे पोलिस अंमलदार यांना सोबत घेवून भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता बँकेतील शिपाई गितेश नारायण भिमनेन्नीवार याच्यावर संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे बँकेतील सहकारी अकाउंटंट भारत सोनटक्के व क्लार्क रितेश विराळे याचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.



सदर आरोपी कडून गुन्हयात चोरी गेलेले नगदी रुपये 11,00,000/- व आरोपी नामे गितेश भिमनेन्नीवर याचेकडून चोरीच्या पैशातून खरेदी केलेले 4,60,500/- रुपयाचे सोन्याचे दागिणे असा एकूण 15,60,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी 1) भारत देविदास सोनटक्के, वय 58 वर्ष, भा.म.सह. बँक कॅशिअर, रा.एस.व्ही.एम. कॉलनी किनवट 2) रितेश संग्राम विराळे, वय 30 वर्ष, भा.म.सह. बँक क्लार्क, रा. गोकुंदा, किनवट 3) गितेश नारायण भिमनेन्नीवार, वय 33 वर्ष, भा.म. सह. बँक शिपाई, रा. बेल्लोरी, किनवट यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक भोकर डॅा खंडेराव धरणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल बिर्ला, पो.स्टे. किनवट उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि संतोष शेकडे, पोउपनि सागर झाडे, पोउपनि दिनेश येवले, पोलिस अंमलदार सुरेश घुगे, गजानन डुकरे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, अनिल बिरादार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!