
व्यापारी लुटी प्रकरणातील फरार आरोपींना युनीट १ घातल्या बेड्या…
व्यापा-यास रस्त्यात अडवुन त्याचे जवळील १७ लाख रूपये जबरीने चोरी करणारे ०२ मुख्य सुत्रधार व फरार आरोपी यांना युनीट १ ने केले जेरबंद….
व्यापाऱ्याला लुटनारे ४८ तासाचे आत युनीट १ च्या ताब्यात,१४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत..

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१७) रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास फिर्यादी दिलीप छाजेड हे श्री. पवन लोढा यांचे दुकानातील रोख रूपये १७ लाख असे त्यांचे मालकांचे घरी अॅक्टीव्हा मोपेड वरून घेवुन जात असतांना अनोळखी ०३ इसमांनी आरटीओ ऑफीस जवळील वजन काटयाजवळ त्यांना आडवुन, मारहाण करून त्याचे जवळील १७ लाख रोख रूपये जबरीने चोरून नेले होते. त्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाणे ९२ / २०२४ भा.द.वि. कलम ३९२, ३४१, ३२३, ३४
प्रमाणे दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याने सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेणे बाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलीस पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देवुन त्या भागातील सिसिटिव्ही फुटेज ची पाहणी केली, त्यानंतर तांत्रीक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून ०५ आरोपी निष्पन्न करून दिनांक १९/०४/२०२४ रोजी ०३ आरोपींचे ताब्यातुन १४,३२,१३०/- रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला होता.व पाहीजे असलेल्या आरोपींचा शोध सुरु होता
सदर आरोपींचे फरार साथीदार सागर पगारे, वैभव उर्फ मऊ गांगुर्डे दोन्ही यांचा शोध घेत असतांना दि. २०/०४/२०२४ रोजी पोलिस अंमलदार अमोल कोष्टी व जगेश्वर बोरसे यांना संशयित आरोपी पांढ-या रंगाच्या स्विप्ट कार क्रमांक MH15-EB-4129 मध्ये बसुन जेलरोड परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाले वरून सदर ठिकाणी सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल,पोलिस अंमलदार जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार अशांनी सापळा लावुन त्यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) सागर सुधाकर पगारे, रा- फ्लॅट नं. १३ साईस्नेह अपार्टमेंट समर्थनगर, पंचवटी नाशिक, २) वैभव उर्फ मऊ संजय गांगुर्डे, रा-
बजरंग अपार्टमेंट फ्लॅट नं. ०२, अश्वमेध कर्णनगर, पंचवटी नाशिक असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांचे ताब्यातुन ४,४५,०००/- रूपये किंमतीची मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH15-EB-4129 व ४,५०० /- रोख रूपये असा एकुण किं.रु. ४,४९,५००/- चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल,सफौ सुरेश माळोदे, पो.हवा शरद सोनवणे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, धनंजय शिन्दे, नाझीम पठाण,पोलिस अंमलदार नितीन जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड, समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.



