सोनसाखळी ओरबाडुन नेणारा २४ तासाचे आत स्थागुशा पथकाने केले गजाआड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गिरणारे रोड, गोवर्धन शिवारात महिलेची सोन्याची पोत ओरबाडणारे गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केले गजाआड….. 

नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारचे सुमारास नाशिक ते गिरणारे रोडवर गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जंमत परिसरात फिर्यादी  छबुबाई वाघ, वय ५५ वर्षे या त्यांचे चहाचे टपरीवर त्यांचे मुलाशी
फोनवर बोलत असतांना मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात दोन इसमांनी त्यांचे गळयातील सोन्याची पोत ३५,०००/- रूपये किंमतीची बळजबरीने हिसकावून जबरी चोरी करून मोटर सायकलवर पळून गेले म्हणून नाशिक तालुका पोलिस ठाणे गुरनं ३४ / २०२४ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,अपर पोलिस अधीक्षक  आदित्य मिरखेलकर,अनिकेत भारती यांनी नाशिक तालुका पोलिस
ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व नाशिक तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांनी घटनास्थळावर पोलिस पथकांना पाचारण केले. त्याप्रमाणे पोलिस पथकांनी घटनास्थळ परिसरात रोडवरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरांची पडताळणी करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे विचारपुस केली. त्याआधारे आरोपीतांचे मिळालेले वर्णन व गुन्हयात वापरलेली मोटर सायकलचा शोध घेतला असता, यातील आरोपी हे नाशिक शहारातील असल्याचे समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने समांतर तपास करून ध्रुवनगर परिसरातून संशयीत





१) सागर दिनकर देवरे, वय २४, रा. शिल्पा आनंद सोसायटी ,शिवाजीनगर, नाशिक,



२) चंदर सिताराम फसाळे, वय २७, रा. लाडची, धोंडेगाव, ता. जि. नाशिक यांना
ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी नाशिक ते गिरणारे रोडवर हॉटेल गंमत जंमत येथील एका चहाचे टपरीवरील महिलेची पोत जबरीने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील ताब्यात घेतलेले आरोपी सागर देवरे व चंदर फसाळे यांचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरून
नेलेली सोन्याची पोत व गुन्हयात वापरलेली होन्डा शाईन मोटर सायकल असा एकुण ७०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी नाशिक तालुका पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक  विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व  अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सत्यजित आमले, सायबर पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक  रविंद्र मगर, स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभिरे, पोहवा गोरक्षनाथ संवस्तरकर, किशोर खराटे, प्रविण सानप, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नाशिक तालुका पो.स्टे. चे पोहवा नंदु वाघ, शितल गायकवाड, सायबर पो.स्टे. पोना परिक्षीत निकम, प्रमोद जाधव यांनी वरील गुन्हा २४ तासात उघडकीस आणून कामगिरी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!