नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दारु तस्करीचे मोठे रॅकेट…
राज्यात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारे गजाआड; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केला लाखोंचा मद्यसाठा जप्त…
गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….
नाशिक (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर (दि.०५एप्रिल) रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणारे ट्रकवर छापा टाकून ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाणे येथे गुरनं ९५/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात एक आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याचे कब्जातील ट्रकमधून गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे ४४८ बॉक्स किं.रू.४३ लाखांचा मद्यसाठा हा जप्त करण्यात आला होता.
याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातुन मद्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेवुन जाणार असल्याचे तपासात समोर आले होते. सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचे मद्य हे गोवा राज्यातील महेश शेठ व बिलाल यांचे सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ यांचे मार्फतीने त्यांचे आर्या ट्रान्सपोर्टकडील वाहनातून गुजरात राज्यात राजु शेठ यांचेकडे पाठविण्यात येणार असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
सदर प्रकरणातील परराज्यातुन होत असलेल्या अवैध मद्य तस्करीचे पाळे-मुळे नष्ट करण्यासाठी, तसेच यातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकांना तपासकामी गोवा व राजस्थान राज्यात रवाना करण्यात आले होते. स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकाने गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा-कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवुन यातील मद्याचा पुरवठा करणारे १) महेशकुमार भुरालाल तन्ना, (वय ५८ वर्षे), घडरा.राजश्री टॉवर, सॅटलाईट, अहमदाबाद, गुजरात, हल्ली – मार्टीन एनक्लेव्ह, मिरामार, पणजीम, गोवा. (गोवा राज्य निर्मित महा-पार्टीदार), २) बिलाल उर्फ अदान सैफुधीन मन्सुरी, (वय २८वर्षे), घडरा. जमजम सोसायटी, ओलपाड, सुरत, गुजरात, हल्ली – मार्टीन एनक्लीव्ह, मिरामार, पणजीम, गोवा (गोवा राज्य निर्मित महा तस्करी मॅनेजर), ३) आशिष अमरचंद फिरोदीया, (वय ५३वर्षे), रा.३०३, प्रियंका ब्लॉसम, सिरीन मिडोज, गंगापुर रोड, नाशिक या गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले आहे.
यातील आरोपी मद्य पुरवठादार महेशकुमार तन्ना हे गोवा राज्यात निर्मित व मर्यादीत असलेला मद्यसाठा हा नाशिक येथील आशिष शेठ फिरोदीया यांचे मार्फतीने महाराष्ट्र व गुजरात राज्यात तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील आरोपी आशिष फिरोदीया यास नाशिक शहरातील गंगापुर रोड परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील आरोपी आशिष फिरोदीया हा त्याचे अवैध मद्य तस्करी मधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्हयासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता. जिल्हयातील परराज्यातुन येणारे अवैध मद्याचे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके कारवाई करत असून महेश तन्ना याचा नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदीया याचे अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळे-मुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
यातील तीनही आरोपींना वडनेर भैरव पोलिस ठाणे वरील गुन्हयात अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्यांची १४ दिवस पोलिस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे आणखी २४० बॉक्स किं.रू. २३,०४,०००/- चा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील उर्वरित आरोपींचा पोलिस पथक कसोशिने शोध घेत असुन मद्य तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामिण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, येवला तालुका पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक संदिप मंडलीक, स्थागुशाचे पथकातील सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, संदिप नागपुरे, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना. विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड, मनोज सानप, कुणाल मोरे, प्रविण गांगुर्डे, चालक तानाजी झुरडे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.