चांदवड दारु तस्करी व अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने नंदुरबार येथुन घेतले ताब्यात…
अवैध मद्य तस्करीतुन झालेल्या हत्येच्या गुन्हयातील आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तळोदा, नंदुरबार येथुन घेतले ताब्यात…
अवैध मद्य तस्करीसाठी वाहनांचा पुरवठा करणाऱ्यांस सुरत येथुन घेतले ताब्य
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०७)जुलै २०२४ रोजी रात्रीचे सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या
मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते. या घटनेत लासलगाव पोलिस ठाण्याचे दोन पोलिस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते.सदरच्या घटने बाबत चांदवड पोलिस ठाणे येथे गु.र.नं. २७३ / २०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१), १०९, १३२, २३८, ३२४(४), १२१ (१), (२), ३(५), ६१ (२) सह मोटर वाहन का. क. १८३, १८४,१३४(अ),(ब)/१७७, ७९ (१), ६१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेवून यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करनेकामी जिल्हयात व परराज्यात पथके रवाना केली होती. त्यानुसार पोलिस पथकांने सदर गुन्हयातील आरोपी १) देवीश पटेल, २) अशपाक अली शेख, ३) राहुल सहाणी, ४) शोहेब अन्सारी या चार आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्हयातील उर्वरित आरोपींचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास रवाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार जिल्हयातील तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे सदर प्रकरणातील गुन्हयाचे दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतुक करणा-या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेला व परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी ५) भावेशकुमार
मोहनभाई प्रजापती, वय ४२, रा. शिवशक्ती इस्टेट, साईविला सोसायटी, ओलपाड, ता. जि. सुरत, राज्य गुजरात यास तळोदा, नंदुरबार येथुन शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपी हा घटनेच्या
दिवशी यातील मुख्य क्रेटा कारसोबत त्याचेकडील किया सोनेट कारमध्ये मद्यसाठा घेवुन अवैधरित्या वाहतुक करत होता, त्यास गाडी थांबविण्याचा इशारा केला असता, तो पोलिसांना हुलकावणी देवुन फरार झाला होता. सदर आरोपीस वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून
गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे. जिल्हयाचे सीमावर्ती भागातून होणारे अवैध मद्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट
करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे तत्पर कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा गणेश वराडे, मुकेश महिरे, धनंजय शिलावटे, पो.ना. संदिप झाल्टे, तसेच तांत्रिक विश्लेषन विभागाचे पोना प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, भाउसाहेब टिळे यांचे पथकाने केली आहे.