उस्मानाबाद ढोकी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ढोकी(उस्मानाबाद )( प्रतिक भोसले) – पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 05.09.2023 रोजी ढोकी पोठा हद्दीत गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ढोकी तेवाकरवाडी रोडचे उजवे बाजूस स्मशान भुमिच्या बाजूला काही इसम तिरट मटका जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 19.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे

1). गौसमिया उर्फ राजु हबीब हत्तीवाले वय 37 वर्षे,





2).चंद्रकांत विठ्ठलराव वाकुरे,



3) सुनिल शिंदे,



4) अमोल गोरोबा कसबे,

5)विनोद शिवाजी ढवारे,

6) हरिभाउ मुकूंद आदमाने

हे सर्व लोक तिरट मटका जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्डयावरुन तिरट मटका जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम, चार मोटरसायकल असा एकुण 1,36,100 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे पोलिस उपअधिक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  राऊत ढोकी पोलिस ठाणे याच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!