उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने केला जालना येथील दुहेरी खूनाचा उलगडा

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उस्मानाबाद (प्रतिक भोसले) – सविस्तर वृत्त असे की, दि.31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की, जालना जिल्ह्यातील पोलिस ठाणे सेवली गुन्हा रजि नं. 133/2022 भा.द.वि कलम 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 मधील या दुहेरी खुन प्रकरणातील आरोपी नामे सुधाकर तुकाराम शिंदे, वय 43 वर्षे, रा. एरंडगाव, अचानक तांडा, जि. जालना हा स्व:ची ओळख व नाव लपवून रवी या नावाने कारी, ता. बार्शी, जि. सोलापूर या ठिकाणी राहत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करुन सदर ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो पोलिसांची चाहुल लागताच पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेवून जालना पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.

अशा प्रकारे सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- संदीप ओहोळ, पोलिस हवलदार-विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, पोलिस नाईक-बबन जाधवर, पोना- नितीन जाधवर,चालक पोलीस अंमलदार- महेबुब आरब, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.











WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!