डोळ्यात मिर्ची पावडर घालुन लुटणारी टोळी परभणी स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

डोळ्यात चटणी टाकून रोड रॉबरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात….

परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमित अशोक सोनकांबळे, फायनान्स, ची वसूली करून गंगाखेडकडे मोटारसायकलवर येत असतांना पाठिमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकल्याने ते दोघे खड्डयात पडले. त्यानंतर सदर अनोळखी आरोपींनी त्यांचे जवळील नगदी 91,440/- रुपये असलेली बॅग व एक मोबाईल असा एकूण 97,440/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. त्यावरून पो.स्टे. पिंपळदरी येथे गु.र.नं.
34/2024 कलम 392, 34 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा याचा समांतर तपास करीत होती ,दिनांक 06/03/2024 रोजी स्था.गु.शा. चे पथकाला सदर गुन्हा जयवंत गायकवाड, रा. रुई, ता. कंधार, जि.नांदेड व त्याच्या साथीदाराने केला असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्था.गु.शा.च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा पाळत ठेवून केल्याचे सांगून सदर गुन्हा करतांना त्याचे सोबत मोहम्मद समीर, रा. हैद्राबाद हा असल्याचे सांगीतले.
त्यावरून स्था.गु.शा.चे पथकाने सदर दुसरा आरोपी नामे मोहम्मद समीरुद्दीन मोहम्मद गुलाम दस्तगीर, वय 36 वर्षे, रा. कोर्ट बाजार, कंधार, जि. नांदेड, ह.मु. काजीपूरा, शहाअली बंडा, चारमिनार हैद्राबाद, तेलंगना यास सापळा रचून ताब्यात घेतले सदर गुन्हा करताना त्याने त्याची यामाह कंपनीची FZS मोटार सायकल क्रमांक TSO8GW5022 हि वापरली असल्याचे सांगीतले.
गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व 24,000/- रुपये नगदी असा एकूण 1,04,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक परभणी,  यशवंत काळे, अपर पोलिस अधीक्षक परभणी, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागिय पोलिस अधिकारी, गंगाखेड, समाधान पाटील, उपविभागिय पोलिस अधिकारी अशोक घोरबांड, पो.नि. स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि..पी.डी.भारती, स.पो.नि.दिनेश सुर्यवंशी,पोउपनि गोपीनाथ वाघमारे,  अजीत बिरादार, पोलिस अंमलदार विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण,
नामदेव डूबे, मधुकर ढवळे, राम पौळ, बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, राहुल परसोडे, दिलावर पठाण, परसराम गायकवाड, शेख रफीयोदिन, निलेश परसोडे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रे वार,कैलास केंद्रे, संजय घुगे, रत्नाकर मुरकूटे ने. स्था.गु.शा. व गणेश कौटकर, राजेश आगाशे ने.सायबर पो.स्टे. यांनी
मिळून पार पाडली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!