१४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी-चिंचवड ने २ तासाचे आत केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड़)-सुनील सांबारे-सवीस्तर व्रुत्त असे की अशी  दिनांक- १२/०९/२०२३ रोजी सुमारे ०७:०० वा. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दितील ताथवडे येथिल एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे झेन गाडी मधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले बाबत माहीती मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली व सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी  गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि सर्व अधिकारी व पोलिस अंमलदार यांना तात्काळ घटनास्थळी जावुन तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-४ चे सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मुलाचे अपहरण केलेल्या ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात तीन इसम हे एका निळया रंगाचे झेन गाडी मध्ये अपहरण केलेल्या मुलास घेवुन जात असल्याचे दिसत होते. त्याच दरम्यान गुन्हे शाखा युनिट-४ ने अपहरण केलेल्या मुलाचे काका यास ताब्यात घेवुन त्याचे कडे चौकशी करुन त्याचे कडुन माहिती काढण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान सदर अपहरण झालेल्या मुलांच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांका वरुन फोन करुन एका इसमाने “३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडुन त्यास मारुन टाकतो” अशा प्रकारचा खंडणीचा फोन करत होते.तेव्हा अपहरण करणाऱ्या इसमां बाबत मिळालेल्या बातमीदाराकडुन व पोशि प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिकविश्लेषणा वरुन अपहरण करणारे इसम हे सासवड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने युनीट ४ चे सपोनि देशमुख, दरोडा विरोधी पथक व पोउपनि रायकर, गुन्हे शाखा युनिट-४ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सदर ठिकाणी रवाना केली. तसेच त्यादरम्यान आम्ही वपोनि शंकर आवताडे यांनी पोलीस उप-अधिक्षक बरडे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांचे पोनि अविनाश शिळीमकर, सासवड पो ठाण्याचे पोनि जाधव, राजगड पो ठाण्याचे पोनि आण्णाघोलप यांना देखिल संपर्क करुन त्यांना सविस्तर प्रकार सांगुन आरोपींचे वर्णन सांगुन तात्काळ नाकाबंदी लावण्याससांगितले. त्यांनतर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे व सासवड पोलीस ठाणे यांनी योग्य तो समन्वय साधुन तात्काळ प्रतिसाद दिल्याने आवघ्या अडीच तासात सापळा लावुन आरोपी

१) तेजस ज्ञानोबा लोखंडे,वय-२१ वर्षे, रा-दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव, पुणे





२) अर्जुन सुरेश राठोड, वय-१९ वर्षे, रा-दत्त मंदिर शेजारी,
मारुंजीगाव, पुणे



३) विकास संजय मस्के, वय-२२ वर्षे, रा- शिवार वस्ती, भुमकर चौक, पुणे.



या खंडणीखोर तीन आरोपींना शिताफीने झेन गाडीसह ताब्यात घेवुन त्यांचे तावडीतुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात यश मिळाले आहे. तसेच सदर आरोपींकडे मिळुन आलेल्या गाडीची पाहणी केली असता त्यात तीन मोबाईल फोन, ०१ छऱ्याचे पिस्टल, ०१ अडीच फुट लांबीचा कोयता, ०१ सुरा, छन्नी, हातोडा, ०२ मास्क असा मुद्देमाल जप्त केला असुन त्यांचेकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपी यांनी अपहरण केलेल्या मुलाचे वडीलांबाबत माहिती काढली होती की त्यांचा भंगाराचा व्यवसाय असुन त्याचे कडे खुप पैसे आहेत त्याचे मुलाचे अपहरण केले तर खुप पैसे मिळु शकतात त्यासाठी त्यांनी पाच दिवस सदर मुलाचे अपहरण करण्यासाठी निरीक्षण पाहनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी सदर मुलाचे अपहरण केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. तसेच सदर आरोपींनी खंडणी मागण्याकरिता वापरलेले मोबाईल फोन हे भुमकर चौक व मारुंजीपरिसरातुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपींना पुढील तपासकामी हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-१०६६/२०२३ भा.दं.वि.कलम-३६४ (अ) या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे  सह पोलिस आयुक्त श्री. डॉ.संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी पोलिस उप-आयुक्त, काकासाहेब डोळे पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे  सतिष माने सहा. पोलिस आयुक्त, हिरे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडाविरोधी पथक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक शिंदे, सपोनि, अंबरिष देशमुख, दरोडा विरोधी पथक, सपोनि सिद्धनाथबाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, पोहवा/ प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, सुखदेव गावंडे तांत्रिकविश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा/नागेश माळी,पोपट हुलगे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!