ससुन रुग्नालय गेटजवळ सापडलेल्या ड्रग रॅकेटचा सुत्रधार ललित पाटील झाला फरार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 पुणे – ड्रग रॅकेटचा तस्कर ललित पाटील हा येवरडा कारागृहात
शिक्षा भोगत होता त्यातच त्याला विविध आजाराने ग्रासले म्हनुन आजारांमुळे जूनपासून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. तो
रुग्णालयात राहून ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच उघड केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील हा सोमवारी रात्री ससून
रुग्णालयातून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे पोलिसांच्या रुग्णालयातील बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.ससून रुग्णालयातून कैद्याकडून ड्रग्स रॅकेट चालण्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघड झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले होते. त्या ड्रग्सची किंमत
सुमारे दोन कोटी रुपये होती.  या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपी ललीत पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार  झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ललित पाटील याच्यासह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड ) आणि रौफ रहिम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता )
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ललीत  पाटील याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला
रुग्णालयातून सोडल्यानंतर अटक करण्यात येणार होती. मात्र, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक १६ मधून ललित पाटील बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ललित पाटील याने छातीत दुखत असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर त्याचा एक्स रे काढण्यासाठी त्याला दुसऱ्या रुममध्ये नेले जात होते. त्यावेळी पोलिसांना हिसका देऊन तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बंड गार्डन पोलिस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला.  तसेच या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
ललीत पाटील याला चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याचे सांगून जून २०२३ मध्ये तो ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक १६ मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. ललीत  पाटील स्वत: मेफेड्रोन तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. या प्रकरणात मंडल आणि शेख यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.होते









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!