अवैधरित्या शस्त्राची देवावघेवान करणारे शिरुर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

शिरुर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्राची  विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ गावठी पिस्टल,९ जिवंत काडतुसह ४ अटकेत…

पुणे(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १०/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलिस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे या गावाकडे जाणारे रोडवर पुणे ते अहमदनगर
हायवे ब्रीज जवळ काळया रंगाच्या काचा असलेली एक लाल रंगाची स्विफ्ट कार पहाटेच्या वेळी येणार असून कार मधील इसम हे पिस्टल ची देवाण घेवाण करणार आहेत, अशी बातमी मिळाली होती. सदरची बातमीचा आशय वरीष्ठांना सांगून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा
रचून गोलेगाव ता. शिरूर जि पुणे गावाकडे जाणारे रोडलगत पुणे – अहमदनगर हायवे ब्रीज येथे आलेल्या एका लाल रंगाचे स्विफ्ट कारवर कारवाई केली असता, कारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार





१) संकेत संतोष महामुनी वय २४ वर्षे, रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे,



२) अभिषेक ऊर्फ घ्या हनुमान मिसाळ, वय २३ वर्षे, रा.सोनारआळी, शिरूर ता. शिरूर जि. पुणे,



३) शुभम दत्तात्रय दळवी, वय २७ वर्षे, रा. प्रितमप्रकाश नगर, शिरूर
ता. शिरूर जि. पुणे,

४) गणेश ऊर्फ श्रीरंग शंकर महाजन, वय ३० वर्षे रा. गोलेगाव, ता. शिरूर जि. पुणे

हे मिळून आले. त्यांचेकडून तीन गावठी पिस्टल व नऊ जिवंत काडतूस मिळून आले आहेत.सदर आरोपींवर अवैध अग्निशस्त्र बाळगणे व शरीराविरूद्धचे मारामारीचे गुन्हे यापुर्वी दाखल असून
यातील आरोपी नामे संकेत संतोष महामुनी यास काही महीन्यापूर्वीच अवैध पिस्टल बाळगून विक्री केले प्रकरणी
पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचेकडून आठ पिस्टल हस्तगत केले होते. सदर आरोपी  संकेत महामुनी याचेवर ४ गुन्हे, आरोपी अभिषेक मिसाळ यांचेवर २ गुन्हे, आरोपी शुभम दळवी यांचेवर ४ गुन्हे, आरोपी गणेश महाजन याचेवर ०६ गुन्हे असे यापुर्वी दाखल आहेत .
सदर आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता, त्यांची दि. १३/०२/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून आरोपींनी अवैध पिस्टल कोठून आणले आहेत, कोणत्या कारणासाठी आणले आहेत, याबाबत पुणे ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.
सदरची कामगिरी  पोलिस अधीक्षक पंकज देशमूख,पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे  पुणे विभाग,  उपविभागीय पोलीस अधिकारी. प्रशांत डोले शिरुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोउपनि गणेश जगदाळे, पोलिस शिपाई तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, संजय जाधव, योगेश नागरगोजे, चालक सफौ मुकुंद कदम चालक पोशि दगडू विरकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!