साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, आरोपीला अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, आरोपीला अटक

पुणे (प्रतिनिधी) – पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा छडा लावत पर्वती पोलिसांनी आरोपीला अटक केली. आर्थिक वादातून आरोपीने महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६, रा.खेड शिवापूर, ता.हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर दादाहरी साठे (वय-२६, रा. सुतारदरा, कोथरूड, मूळ रा. पाटील इस्टेट) याला अटक केली आहे. टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये कुजलेले आणि दुर्गंधी येत असलेले एक प्रेत मिळून आले आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलीसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.





या बाबत सविस्तर माहिती अशी की, (दि.१७ऑगस्ट २०२०) रोजी दु.१४.०० वा.सु. निखील माने (वय १९ वर्षे), रा.जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या ठिकाणी भयंकर दुर्गंधी येत आहे. खबर मिळताच त्या ठिकाणी पोलीस पथक रवाना झाले. नमूद ठिकाणी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलीसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मृत महिला वर्णन एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे अंगावर काळया रंगाचा ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर, हातात काचेच्या बांगड्या व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच डाव्या हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले.



याबाबत तात्कालीन पोलीसांनी अकस्मात मयत दाखल करुन तपास सुरु ठेवला होता. परंतू नमूद महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. दि.०७डिसेंबर रोजी या बाबत पर्वती पोलीस ठाण्यात रितसर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास वपोनि पायगुडे हे करीत होते. त्यानंतर वपोनि पायगुडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदशानाखाली पर्वती पोलीसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जाऊन शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन्स येथे तपासले असता या वर्णनाची महिला हि दि.१२ ऑगस्ट २०२० रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित खेड-शिवापूर पोलीस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले.



याबाबत पोलीस निरीक्षक खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्या नंतर रात्रंदिवस पाठपुरावा करुन रोहन चव्हाण यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन एका संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अत्यंत हुशारीने चौकशी करता त्याने त्याचे नाव सागर दादाहरी साठे (वय २६ वर्षे), रा.सुतारदरा, कोथरुड, पुणे मुळ रा.पाटील इस्टेट, गल्ली नंबर ०५, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगून त्याने त्याच्या ओळखीची महिला नामे सुरेखा संतोष चव्हाण वय (३६ वर्षे), रा.वेताळनगर, शिवापूरवाडा ता.हवेली, जि.पुणे हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून केल्याचे कबूल केल्याने त्याला पर्वती पोलीस स्टेशन गु.र. नं ३६८/२०२३ भादंवि कलम ३०२ मध्ये अटक करण्यात आली आहे.
नमूद गुन्ह्यात सर्वप्रथम तिची ओळख पटणे हे महत्वाचे होते तसेच मयत महिला तसेच आरोपी यांचेबाबत काही एक माहिती उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने पोलीस तपास करुन दोनच दिवसात पर्वती पोलीस ठाण्याच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगीरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग आप्पासाहेव शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि जयराम पायगुडे, पो.नि. गुन्हे विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!